पंजाबमध्ये चमत्कारिक निकाल

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. पंजाबमध्ये एकूण ११७ जागांपैकी आप ९०, काँग्रेस १८, अकाली दल ०६ आणि इतर १ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पांजबमध्ये आम आदमी पक्षाने बहुमताने आघाडी घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्री चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांसारखे अनेक दिग्गज पिछाडीवर आहेत. देशातील सर्वात जुने उमेदवार आणि […]

पंजाबमध्ये चमत्कारिक निकाल

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. पंजाबमध्ये एकूण ११७ जागांपैकी आप ९०, काँग्रेस १८, अकाली दल ०६ आणि इतर १ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पांजबमध्ये आम आदमी पक्षाने बहुमताने आघाडी घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्री चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांसारखे अनेक दिग्गज पिछाडीवर आहेत.

देशातील सर्वात जुने उमेदवार आणि पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल हे लांबी विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवाराकडून पिछाडीवर आहेत. तर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल जलालाबाद विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

पंजाबमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेसचे नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, लोकांचा आवाज, हा देवांचा आवाज आहे. पंजाबच्या जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारला आहे, असे म्हणत त्यांनी आप पक्षाचे अभिनंदन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number