ऑनलाईन खरेदी मीरा राजपूतला पडली महागात

मुंबई : आजकाल अनेकजण ऑनलाईन खरेदी करतात मात्र अनेकदा असं होते की, आपण काही मागवितो वेगळं आणि येते भलतचं. अशी अनेकवेळा फसवणूक होते. आता असाच फसवणुकीचा अनुभवअभिनेता शाहिद कपूरच्या बायकोला म्हणजेचं मीरा राजपूतला आला आहे. आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मीरा राजपूत हिने मोबाईलसाठी एक कव्हर ऑनलाईन मागवले होते. मात्र त्याऐवजी तिला दुसरेच कव्हर […]

ऑनलाईन खरेदी मीरा राजपूतला पडली महागात

मुंबई : आजकाल अनेकजण ऑनलाईन खरेदी करतात मात्र अनेकदा असं होते की, आपण काही मागवितो वेगळं आणि येते भलतचं. अशी अनेकवेळा फसवणूक होते. आता असाच फसवणुकीचा अनुभवअभिनेता शाहिद कपूरच्या बायकोला म्हणजेचं मीरा राजपूतला आला आहे. आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मीरा राजपूत हिने मोबाईलसाठी एक कव्हर ऑनलाईन मागवले होते. मात्र त्याऐवजी तिला दुसरेच कव्हर पाठवण्यात आले आहे. मीराने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत झालेल्या फसवणुकीची माहिती दिली असून तिने आपल्या आयफोनसाठी एक महागड्या कव्हरची ऑर्डर केली होती आणि याचे ऑनलाईन पेमेंटही तिने केले होते. मात्र मीराने जे कव्हर मागवले होते त्याऐवजी भलतेच कव्हर तिला पाठविण्यात आले. इतकेच नाही तर कव्हरची क्वालिटी ही देखील फारचं वाईट आहे. या कव्हरच्या तळात काही छिद्र पडलेले आहे आणि या छिद्रांना झाकण्यासाठी चक्क स्टिकरचा उपयोग केला गेला आहे.

हा प्रकार पाहून मीरा चांगलीच संतापली आहे. त्यानंतर मीराने आपला राग सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला असून कव्हरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ एक जाहिरात पाहून मी हे फोन कव्हर ऑनलाईन विकत घेतले. जाहिरातीमध्ये जे कव्हर दाखवले होते ते पाहून मी कव्हर मागवले होते. परंतु मला पाठवण्यात आलेले ते हे कव्हर नाही. हे प्लास्टिकचे कव्हर आहे. मला एक स्लिंग कव्हर पाहिजे होते, जेणेकरून बाहेर फिरायला जाताना मला बॅग घेऊन जायची गरज पडणार नाही. हो, माझ्या पॅन्टला खिसे नाहीत. ‘ असे सांगत मीराने तिची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती दिली आहे. मीराच्या या पोस्टवर सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे. तसेच काही युझरनी तिला कोणत्या बेवसाईटवरून हे मागवले याबाबत विचारणा केली आहे तर काहींनी तिला याची तक्रार सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number