रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे या तीन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि आणि हार्बर रेल्वे या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर वसई ते भाईंदर स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर आणि वांद्रे ते माहिमदरम्यान रविवारी रात्री 12.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी चुनाभट्टी, वांद्रे हार्बर डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/ वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.