राज्यातील ६८ हजार आशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कोरोना काळात मिळणार्या भत्त्यात वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी आशा कर्मचारी संपावर जाणार आहेत. आशा कर्मचाऱ्यांना कोरोना काळात मानधनाव्यतिरिक्त दिवसाला ३५ रुपये म्हणजेच महिन्याला एक हजार रुपये भत्ता दिला जातो. महिन्याला पाच हजार भत्ता देण्याची मागणी राज्य आशा कर्मचारी कृती समितीने केली आहे.
या संपामध्ये जवळपास ६८ हजार कर्मचारी संपावर जाणार असून या संपाचा ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर परिणाम होणार आहे. कोरोना उपचार आणि कोरोना लसीकरण मोहिमेत आशा कर्मचारी करत आहेत. प्रोत्साहन भत्ता मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.