‘चला, कामाला लागूया’ – देवेंद्र फडणवीस

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकींमध्ये पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपा विजयी झाली आहे. उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजप विजयी झाली आहे तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी विजयी झाली आहे. दरम्यान, चार राज्यांमध्ये भाजपाला विजय मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार बनवण्यासाठी कामाला लागूया, असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी […]

‘चला, कामाला लागूया’ – देवेंद्र फडणवीस

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकींमध्ये पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपा विजयी झाली आहे. उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजप विजयी झाली आहे तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी विजयी झाली आहे. दरम्यान, चार राज्यांमध्ये भाजपाला विजय मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार बनवण्यासाठी कामाला लागूया, असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विजयाने होरपळून जायने नाही, तर विजयाने अधिक मेहनत करायची आहे. आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही भ्रष्टाचाराविरोधात मैदानात उतरलो आहोत. मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करत नाही तोवर दम घेणार नाही. म्हणून आज हा दिवस साजरा करा. आणि उद्यापासून कामाला लागा. पुन्हा मुंबईत विजय आणि राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा, असे आदेश फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number