वकील सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायायलीन कोठडी सुनावली आहे. आज सदावर्तेंचा ४ दिवसांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर सातारा सत्र न्यायालयाने वकील सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. खासदार उदयनराजें भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल जनभावना भडकावणारं विधान केल्याप्रकरणी वकील गुणरत्न […]

वकील सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायायलीन कोठडी सुनावली आहे. आज सदावर्तेंचा ४ दिवसांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर सातारा सत्र न्यायालयाने वकील सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. खासदार उदयनराजें भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल जनभावना भडकावणारं विधान केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी त्यांना सातारा जिल्हा पोलिसांनी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज त्यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपला असून सातारा सत्र न्यायलयाने वकील सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

दोन वर्षांपूर्वी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे राजेंद्र निकम यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात सदावर्तेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदावर्तेंची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना बोलवले होते. मात्र, सदावर्ते चौकशीसाठी गैरहजर राहिल्यामुळे सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला असून आता सातारा सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number