मुंबईत मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. कर्ज बुडवल्याप्रकरणी कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली होती.मात्र मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देत मोहित कंबोज यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
कंबोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्ज बुडवल्याप्रकरणी कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली होता .कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयाचे कर्ज घेतले होते. पण ते कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते, त्यासाठी त्याचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे.