ODI Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलची कर्णधार म्हणून निवड; भारतीय संघात ‘या’ खेळाडूंचा समावेश

गुवाहाटी येथे चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी निवड समितीने बैठक घेऊन निर्णय घेतला. या बैठकीत केएल राहुलला वनडे संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले.

ODI Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलची कर्णधार म्हणून निवड; भारतीय संघात ‘या’ खेळाडूंचा समावेश

ODI Series Against South Africa: भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गुवाहाटी येथे चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी निवड समितीने बैठक घेऊन निर्णय घेतला. या बैठकीत केएल राहुलला वनडे संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी राहुलकडे सोपवण्यात आली.

हेही वाचा – Rishabh Pant Angry On Kuldeep: ‘तु घरी खेळतोयस का?’ गुवाहाटी कसोटीत ऋषभ पंतचा कुलदीपवर संताप

दरम्यान, संघाचा कर्णधार गिलला कोलकाता कसोटीत दुखापत झाली होती, तर उपकर्णधार अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून तो खेळापासून दूर आहे. या परिस्थितीत आगामी दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी नेतृत्वाची धुरा राहुलकडे देण्यात आली आहे.

हेही वाचा – Smriti Mandhana Father’s Health Deteriorated: मोठी बातमी! स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली, विवाहसोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय

दक्षिण आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

दक्षिण आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्ये केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, रुतुराज गायकवाड, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल या खेळाडूंचा समावेश असणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number