आयपीएल 2026 चा 15 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये होणार आहे. लखनऊ सातव्या क्रमांकावर आहे, तर कोलकाता नवव्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सने अद्याप पहिला सामना जिंकलेला नाही, तर दुसरीकडे लखनऊने एक सामना जिंकला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सची या हंगामाची सुरुवात अगदी खराब झाली. मुस्ताफिझूर रेहमान तर हंगाम सुरू होण्याअगोदरच बाहेर पडला. स्टार गोलंदाज हर्षित राणादेखील दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकला. कॅमरुन ग्रीन अष्टपैलू असूनही त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करण्यास परवानगी मिळालेली नाही. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण दोन्ही दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे दोघांची हवी तशी कामगिरीदेखील झालेली नाही आहे. कोलकातासाठी अजून तरी काही चांगलं होताना दिसत नाही आहे. फिन एलेनने चांगली फलंदाजी केली मात्र तो मोठ्या धावा करू शकला नाही. अंगक्रिश रघुवंशी सोडून कोणताच फलंदाज चांगली फलंदाजी करू शकलेला नाही. गोलंदाजीत ब्लेसिंग मुझरबानीने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. कोलकाताला एका दोघांवर अवलंबून राहून चालणार नाही. कोलकाताला या हंगामात चांगली कामगिरी करायची असेल, तर संपूर्ण संघाने एकत्र येऊन आपले योगदान द्यावं लागेल. वरिष्ठ खेळाडू म्हणून अजिंक्य राहणे आणि रिंकू सिंगला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल.
हेही वाचा – Smriti-Palash News: मुछालने घेतले स्मृतीच्या वडिलांचे आशीर्वाद! एका व्हायरल व्हिडिओमुळे स्मृती-पलाशचं नातं पुन्हा जुळणार?
लखनऊ सुपर जायंट्सची गोलंदाजी अप्रतिम होत आहे. मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, मोहसीन खान यांच्या त्रिकुटाने इतर संघातील सर्व फलंदाजांच्या नाकात दम करून ठेवला आहे, मात्र लखनऊची स्पिन गोलंदाजी हलकी वाटत आहे. जर स्पिन आणि फास्ट गोलंदाजीचा ताळमेळ बसला, तर लखनौ अजून घातक संघ ठरू शकतो. आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स हा सर्वोत्तम पॉवरप्ले गोलंदाजी करणारा संघ ठरला आहे. दोन सामन्यांमध्ये, त्यांनी पहिल्या सहा ओव्हर्समध्ये सात बळी घेतले आहेत आणि त्यांची इकॉनॉमी केवळ 4 आहे, जी स्पर्धेत सर्वोत्तम आहे. लखनऊसाठी दुसऱ्या सामन्यात एडन मार्करमने सलामी फलंदाजी केली आणि तुफान फटकेबाजी करत लखनऊला चांगली सुरुवात दिली. निकोलस पूरन चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाही, जी लखनऊसाठी चिंतेची बाब आहे. लखनऊची मध्यक्रमातील फलंदाजी पूरनच्या अवतीभवती फिरते, पूरन लखनऊच्या फलंदाजीतला मुख्य घटक आहे, त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावा येणं लखनऊसाठी गरजेचं आहे. राजस्थानच्या मुकुल चौधरीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तो कशी कामगिरी करतो हे नक्कीच बघण्यायोग्य असेल.
हाईलाईट्स
खेळपट्टी आणि परिस्थिती