Keith Stackpole Passes Away: क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कीथ स्टॅकपोल यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे. कीथ स्टॅकपोल ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे उपकर्णधार होते. कीथ स्टॅकपोल यांच्या निधनाबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शोक व्यक्त केला आहे. कीथ स्टॅकपोलने 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी 28 जानेवारी 1966 रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. मधल्या फळीतील फलंदाज आणि फिरकी गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कीथला 3 वर्षांच्या आत बिल लॉरीसह ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर बनवण्यात आले.
कीथ स्टॅकपोलने ऑस्ट्रेलियासाठी खेळले 43 कसोटी सामने –
कीथ स्टॅकपोलने ऑस्ट्रेलियासाठी 43 कसोटी सामने खेळले. तसेच 2807 धावा केल्या आणि 15 विकेट्स घेतल्या. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 7 शतके आणि 14 अर्धशतकेही झळकावली. 1971 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कीथचाही समावेश होता. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट्सने विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
All of us at Cricket Australia are mourning the passing of former Australian and Victorian cricketer Keith Stackpole, MBE. Keith was a passionate Victorian and a proud Australian who played the game with spirit, courage and respect. pic.twitter.com/I20gxkTnTN — Cricket Australia (@CricketAus) April 23, 2025
हेही वाचा – कुस्ती पंच नितीश काबलिये 3 वर्षांसाठी निलंबित; राज्य कुस्तीगीर संघाची कारवाई
इंग्लंडविरुद्ध 13 कसोटी सामने –
दरम्यान, स्टॅकपोलची सर्वोत्तम कामगिरी अॅशेसमध्ये दिसून आली. इंग्लंडविरुद्धच्या 13 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी 50.6 च्या सरासरीने 1164 धावा केल्या, ज्यामध्ये 1970 मध्ये ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी क्रिकेटमधील त्यांचा सर्वोच्च धावसंख्या समाविष्ट आहे. इयान चॅपेल यांच्या नेतृत्वाखाली 1972 च्या अॅशेस मालिकेसाठी त्यांना ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. या अॅशेस मालिकेत 53.88 च्या सरासरीने 485 धावा करून तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
हेही वाचा – IPL 2025 मधून कर्णधार ऋतुराज गायकवाड बाहेर, MS Dhoni करणार CSK चं नेतृत्व
तथापी, या शानदार कामगिरीसाठी त्यांना 1973 मध्ये विस्डेनच्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माइक बेयर्ड यांनी म्हटलं आहे की, कीथ हे क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्यांपैकी एक होते आणि त्यांचा वारसा भविष्यातही जिवंत राहील. याशिवाय, क्रिकेट व्हिक्टोरियाचे अध्यक्ष रॉस हेपबर्न यांनी म्हटलं की, ‘स्टॅकपोल हा खेळातील एक दिग्गज होता. क्रीजवरील त्याचे धाडस आणि खेळाची त्याची तीक्ष्ण समज यामुळे तो त्याच्या काळातील सर्वात आदरणीय खेळाडूंपैकी एक बनला.’