नुकताच पार पडलेला कटकमधील 5 सामन्यांच्या मालिकेतील भारताने पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान कटकमध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने सुरुवातीला फलंदाजी करत 175 धावा केल्या. जे पुर्ण करण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 74 धावा केल्या. टीम इंडियाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली 101 धावांनी दक्षिण आफ्रिकेवर 2-1 ने विजय मिळवला. यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली.
अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी जसप्रीत बुमराहने पहिली विकेट घेत इतिहास घडवला. लसिथ मलिंगा, टीम साऊथी, शाकिब अल हसन आणि शाहीन अफ्रिदी यांच्यानंतर जसप्रीत बुमराह टेस्ट, वनडे आणि टी 20I या तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे.
तसेच भारतातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याचसोबत बुमराह टी 20I क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय ठरला असून, यापुर्वी अर्शदीप सिंहने हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. बुमराहने या सामन्यादरम्यान डेवाल्ड ब्रेव्हीस आणि केशव महाराज या दोघांना एकाच ओव्हरमध्ये क्लीन बोल्ड केल. डेवाल्डची विकेट बुमराहसाठी टी 20I क्रिकेटमधील 100 वी विकेट असून ही विकेट महारेकॉर्ड ठरली.
तर दुसरीकडे हार्दिक पंड्या या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा खरा शिलेदार ठरला. ऑलराउंडर हार्दिक पंड्याने 1 गडी बाद करत 28 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोरसह नॉट आऊट 59 धावांचे अर्धशतक झळकावले. हार्दिकच्या या कामगिरीसाठी त्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरव करण्यात आला.