S Jaishankar: एस. जयशंकर यांचा जबरदस्त प्लॅन; पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून चिनाब नदीवर वीज प्रकल्प उभारणार

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर पाकिस्तानला ठाम इशारा दिला आहे.

S Jaishankar: एस. जयशंकर यांचा जबरदस्त प्लॅन; पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून चिनाब नदीवर वीज प्रकल्प उभारणार

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावून सांगत भारताची ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. सिंधू जल कराराच्या (Indus Waters Treaty) मुद्द्यावर बोलताना, पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी “भारताला एक वाईट शेजारी आहे” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. जो देश सातत्याने दहशतवादाला प्रोत्साहन देतो, त्याच्याकडून पाणी वाटपाची अपेक्षा करता येणार नाही, असा थेट संदेश त्यांनी दिला.

शुक्रवारी IIT Madras येथे झालेल्या कार्यक्रमात जयशंकर म्हणाले की, भारताला आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. दहशतवाद हा जर एखाद्या देशाने जाणीवपूर्वक ‘राज्य धोरण’ म्हणून स्वीकारला असेल, तर भारत शांत बसणार नाही. भारत कशी प्रतिक्रिया देईल, हे केवळ नवी दिल्ली ठरवेल, कोणत्याही बाह्य दबावाला भारत बळी पडणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये निलंबित करण्यात आलेल्या सिंधू जल कराराच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानच्या वाट्याच्या चिनाब नदीवर Dulhasti Stage-II Power Project उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर पाकिस्तानची अस्वस्थता पुन्हा उघड झाली आहे. इस्लामाबादने भारताने कोणतीही माहिती न देता प्रकल्प जाहीर केल्याची तक्रार केली आहे.

हेही वाचा: BSNL VoWiFi Service: डोंगरदऱ्यातही आता फोन वाजणार! कॉल,मेसेजसाठी नेटवर्कची गरज नाही, BSNL ची सेवा लवकरच

पाहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात उगाचच आवाज उठवला होता, मात्र त्याला कुठलाही ठोस पाठिंबा मिळाला नाही. उलट, भारताने घेतलेल्या नव्या निर्णयांमुळे पाकिस्तानची कोंडी अधिकच वाढली आहे.

जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “एका बाजूला पाणी मागायचे आणि दुसऱ्या बाजूला भारतात दहशतवाद पसरवायचा, हे भारत कधीही स्वीकारणार नाही.” भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी जे आवश्यक आहे ते करेल, असा ठाम इशारा त्यांनी दिला.

भारताच्या या आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिकेमुळे पाकिस्तानची अस्वस्थता वाढली असून, दहशतवाद आणि पाणीवाटप या दोन्ही मुद्द्यांवर भारताने कोणतीही तडजोड न करण्याचा स्पष्ट संदेश पुन्हा एकदा जगाला दिला आहे.

हेही वाचा: Shivsena Leader Daughter Death: आंघोळीसाठी गेली अन्… वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number