Ishan Kishan Girlfriend: ‘फेमस होण्यासाठी अश्लील कपडे, छोट्या चित्रपटांत काम’… ईशान किशनच्या फॅन्सनी त्याच्या गर्लफ्रेंडचे जुने व्हिडिओ आणले समोर; अदिती हुंडिया होतेय प्रचंड ट्रोल

अदिती हुंडियाचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून तिला ट्रोल केलं जात आहे त्यामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे

Ishan Kishan Girlfriend: ‘फेमस होण्यासाठी अश्लील कपडे, छोट्या चित्रपटांत काम’… ईशान किशनच्या फॅन्सनी त्याच्या गर्लफ्रेंडचे जुने व्हिडिओ आणले समोर; अदिती हुंडिया होतेय प्रचंड ट्रोल

Ishan Kishan Girlfriend: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष सुरू होता, तेव्हा क्रिकेटपटू ईशान किशन आणि त्याच्यासोबत दिसलेली अदिती हुंडिया अचानक चर्चेत आली. सेलिब्रेशनदरम्यान दोघे एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगली, पण लगेचच हा विषय सोशल मीडियावर वेगळ्याच कारणामुळे ट्रेंड होऊ लागला.

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच काही युजर्सनी अदितीचे जुने व्हिडिओ शोधून काढले. विशेष म्हणजे तिच्या मॉडेलिंग करिअरमधील काही क्लिप्स पुन्हा व्हायरल झाल्या. या व्हिडिओंमध्ये ती फॅशन शोमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत असल्याने काहींनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

अदिती हुंडिया ही जयपूरची रहिवासी असून ती मॉडेल आणि उद्योजिका आहे. फॅशन इंडस्ट्रीत तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. पण तिचे हेच जुने व्हिडिओ समोर आल्यानंतर काहींनी तिला ट्रोल करण्याचा सपाटा लावला.

काही कमेंट्समध्ये तिच्या कपड्यांवर आणि लाइफस्टाईलवर टीका करण्यात आली. तर काहींनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, काही लोकांनी संस्कृतीच्या नावाखाली तिला टार्गेट केल्याचंही दिसून आलं.

मात्र, या सगळ्या ट्रोलिंगदरम्यान अनेक नेटिझन्स तिच्या समर्थनातही पुढे आले. “एखाद्याच्या प्रोफेशनवरून त्याला जज करणं चुकीचं आहे” असं म्हणत अनेकांनी ट्रोलर्सना सुनावलं. तसेच, सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याचा आदर ठेवण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त करण्यात आलं.

ईशान किशन आणि अदिती हुंडिया यांच्या नात्याबद्दल अधिकृत माहिती नसली तरी त्यांच्या एकत्र दिसण्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. पण या सगळ्या प्रकारातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट क्षणात व्हायरल होते आणि त्यावर लगेच प्रतिक्रिया येतात.

एकीकडे टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा होत असताना, दुसरीकडे या ट्रोलिंगमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होताना मर्यादा पाळण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number