‘सत्ता आली म्हणून मस्ती आली का ?’

हिंगोली जिल्ह्यात कामगार विभागामार्फत मध्यान भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, मध्यान भोजन योजनेच्या व्यवस्थापकाला जाब विचारताना आमदार संतोष बांगर यांनी थेट त्यांच्या कानशिलात लगावली होती. त्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का? असा हल्लाबोल त्यांनी शिंदे सरकारवर केला. बुधवार पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार […]

‘सत्ता आली म्हणून मस्ती आली का ?’

हिंगोली जिल्ह्यात कामगार विभागामार्फत मध्यान भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, मध्यान भोजन योजनेच्या व्यवस्थापकाला जाब विचारताना आमदार संतोष बांगर यांनी थेट त्यांच्या कानशिलात लगावली होती. त्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का? असा हल्लाबोल त्यांनी शिंदे सरकारवर केला.

बुधवार पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्या संदर्भात अजित पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे सरकारमधील आमदारांच्या वागणुकीवरुन चांगलेच फटकारले. यावेळी अजित पवार म्हणाले, हे सरकार येऊन काही दिवस झाले. मात्र, यांच्यातील आमदार राज्यात संघर्ष पेटावा, अशी भाषा वापरतात आहेत.

शिवसैनिकांना ठोकून काढा हातपाय तोडा अशा प्रकारची चिथावणीखोर भाषा वापरली जाते. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटते का? असा सवाल त्यांनी केला आहे. सत्ता आली तर मस्ती आली का? आमदारांना थांबवले कसे जात नाही. शिंदे गटाचे आमदार गुन्ह दाखल झाला तरी मी असाच वागणार इतकी मस्ती. एखादा माणूस म्हणतो माझी चूक झाली म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. हे राहील बाजूला, असेही पवार म्हणाले. असे प्रसंग झाले तर माध्यमांशी लेखणी चालली पाहिजे.

आज आम्हाला चहा पानासाठी बोलवले होते. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्षाची बैठक झाली. या बैठकीमध्ये आम्ही सरकारच्या चहा पानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. संसदीय परंपरा आणि लोकशाहीला पायदळी तुडवून हे सरकार सत्तेत आले आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number