IPL Auction 2026: आयपीएल ऑक्शनमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान; नेमकं प्रकरण काय?

IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावानंतर केवळ भारतीय क्रिकेटच नाही, तर आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वातही मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) या दोन्ही स्पर्धा एकाच दिवशी 26 मार्चपासून सुरू होणार आहेत. यामुळे खेळाडूंसमोर थेट निवडीचा प्रश्न उभा राहिला असून, बहुतांश परदेशी खेळाडूंनी श्रीमंत आणि लोकप्रिय आयपीएललाच प्राधान्य दिल्याचं स्पष्ट झालं […]

IPL Auction 2026: आयपीएल ऑक्शनमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान; नेमकं प्रकरण काय?

IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावानंतर केवळ भारतीय क्रिकेटच नाही, तर आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वातही मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) या दोन्ही स्पर्धा एकाच दिवशी 26 मार्चपासून सुरू होणार आहेत. यामुळे खेळाडूंसमोर थेट निवडीचा प्रश्न उभा राहिला असून, बहुतांश परदेशी खेळाडूंनी श्रीमंत आणि लोकप्रिय आयपीएललाच प्राधान्य दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचा थेट फटका PSL ला बसला आहे.

आयपीएल ऑक्शन नुकतंच पार पडलं असलं, तरी त्याचे पडसाद पाकिस्तान सुपर लीगवर उमटले आहेत. PSL च्या पुढील हंगामासाठी करारात असलेले किंवा त्या लीगचा भाग असलेले तब्बल 11 खेळाडू आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. यापैकी 10 खेळाडू आयपीएल 2026 च्या लिलावात विकले गेले, तर एका खेळाडूला लिलावापूर्वीच रिटेन करण्यात आलं होतं. या सर्व खेळाडूंवर आयपीएल फ्रँचायझींनी मिळून सुमारे 27.3 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा:ICC T20 World Cup: मोठी घोषणा! 42 वर्षीय 'या' खेळाडूवर टी-20 विश्वचषकाच्या कर्णधार पदाची धुरा

या यादीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक ओळखीची नावं आहेत. फिन एलेन, जेसन होल्डर, टिम सायफर्ट, मॅथ्यू शॉर्ट, अकील होसेन, काइल जॅमीसन, ल्यूक वुड, एडम मिल्न, जॉर्डन कॉक्स, बेन ड्वारशुइस आणि मिचेल ओवन या खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू पुढील PSL हंगामात अनुपस्थित राहणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

लिलावातील व्यवहार पाहता, फिन एलेनला कोलकाता नाईट रायडर्सने 2 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतलं. जेसन होल्डरवर गुजरात टायटन्सने मोठी गुंतवणूक करत 7 कोटी रुपये खर्च केले. टिम सायफर्ट पुन्हा एकदा केकेआरकडे गेला असून, त्याला 1.50 कोटी रुपये मोजावे लागले. मॅथ्यू शॉर्ट आणि अकील होसेन यांना चेन्नई सुपर किंग्सने अनुक्रमे 1.5 आणि 2 कोटी रुपयांत विकत घेतलं.

हेही वाचा: IPL Auction 2026 Sold Unsold Players Full List : आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस! Sold-Unsold खेळाडूंची संपुर्ण यादी पाहा

दिल्ली कॅपिटल्सने काइल जॅमीसनसाठी 2 कोटींची बोली लावली, तर ल्यूक वुड 75 लाखांत गुजरात टायटन्सचा भाग बनला. याशिवाय मिचेल ओवनला पंजाब किंग्सने 3 कोटी रुपयांत आधीच रिटेन केलं होतं. या सगळ्या व्यवहारांमुळे PSL च्या संघरचनेवर मोठा परिणाम होणार आहे.

एकाच कालावधीत होणाऱ्या दोन्ही लीग्समुळे खेळाडूंना निवड करावी लागणं अपरिहार्य ठरलं आहे. आयपीएलची आर्थिक ताकद, जागतिक प्रसिद्धी आणि करिअरवर होणारा प्रभाव पाहता खेळाडूंचा कल आयपीएलकडे झुकणं स्वाभाविक मानलं जात आहे. परिणामी, यंदाचा हंगाम PSL साठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे, तर आयपीएलने पुन्हा एकदा आपली जागतिक मक्तेदारी अधोरेखित केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number