IPL 2026 : 14 वर्षाचा पठ्ठ्याचं थेट ‘कॅप्टन कूल’च्या संघाला ओपन चॅलेंज, म्हणाला "दोन्ही सामन्यात सीएसकेला…"

आयपीएलच्या 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होत असताना राजस्थान रॉयल्स युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारण्यास सज्ज असल्याचं ओपन चॅलेंज दिलं आहे. 

IPL 2026 : 14 वर्षाचा पठ्ठ्याचं थेट ‘कॅप्टन कूल’च्या संघाला ओपन चॅलेंज, म्हणाला &quotदोन्ही सामन्यात सीएसकेला…&quot

आयपीएलच्या 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या मोसमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व टीममध्ये खडाजंगी सामना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. तसेच 30 मार्चला राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात गुवाहाटीतला लढत होणार आहे. अस असताना राजस्थान रॉयल्स युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारण्यास सज्ज असल्याचं ओपन चॅलेंज दिलं आहे. 

हेही वाचा- Gautam Gambhir: 'तो' बनावट व्हिडीओ पडला महागात; न्यायालयाकडून मेटा आणि गुगलला गौतम गंभीरविरोधी पोस्ट हटवण्याचे निर्देश
बीसीसीआयच्या NAMAN पुरस्कार सोहळ्यादरम्यान वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यात काही संवाद झाला. ज्यात राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा वैभव सूर्यवंशी आणि चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या आयुष म्हात्रेला म्हणाला की, "मी राजस्थान रॉयल्स संघात सामील झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्स दोन वेळा हरला आहे. यावेळी देखील चेन्नई सुपर किंग्सची स्थिती 4 0 अशीच असेल." 2025 मधील आयपीएलच्या हंगामात राजस्थान रॉयल्सने दोन सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला हरवून बाजी मारली होती. त्याचप्रमाणे वैभव सूर्यवंशीच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ असा की, यावेळी दोन्ही सामन्यात सीएसकेला पराभूत करू. 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये एकत्र खेळलेल्या या दोन्ही खेळाडूंनी गेल्याच हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान दोन्ही मित्र आयपीएलमधील दोन बलाढ्य संघात खेळताना पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा- Indian Cricketer Job: मैदानावर षटकारांची आतिषबाजी, आता प्रशासकीय जबाबदारी; 'हा' स्टार भारतीय क्रिकेटर बनला प्रादेशिक क्रीडा अधिकारी, पगार किती मिळणार?
2026 हंगामासाठी 'यलो आर्मी' सज्ज
गेल्या हंगामात चेन्नईची कामगिरी संमिश्र राहिली होती. मात्र, 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आणि धोनीच्या मार्गदर्शनाखाली 'यलो आर्मी' पुन्हा एकदा विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. धोनीच्या या नवीन विधानामुळे यंदाचा हंगाम केवळ चेन्नईच्या चाहत्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी खास ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number