IPL 2026 MI vs KKR : 14 वर्षांचा इतिहास अखेर बदलला! रोहित-रायनची कडक ओपनिंग; MI ने घरच्या मैदानात KKR चा धुव्वा उडवला

आयपीएल 2026 या 19 हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात झाली असून, काल 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सची दमदार कामगिरी पाहायला मिळाली.

IPL 2026 MI vs KKR : 14 वर्षांचा इतिहास अखेर बदलला! रोहित-रायनची कडक ओपनिंग; MI ने घरच्या मैदानात KKR चा धुव्वा उडवला

आयपीएल 2026 या 19 हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात झाली असून, काल 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. काल आयपीएल 2026 या हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता किंग्स रायडर्स यांच्यामध्ये रंगला. यावेळी मुंबई इंडियन्सने कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली विजयासह आयपीएलच्या हंगामाला सुरुवात केली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेल्या मुंबईने प्रथम गोलंदाजांचा निर्णय घेतला. दरम्यान कोलकाताने मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाला पुर्ण पडत मुंबई इंडियन्सने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. यावेळी मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.

रोहित-रायनच्या ओपनिंगची कमाल
मुंबई इंडियन्सच्या खेळीबद्दल बोलायच झालं तर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मुंबईच्या विजयाचा मोलाचे योगदान बजावले. ओपनिंगला आलेल्या या जोडीने मुंबईला शतकी सुरुवात करुन दिली. रोहितने 78 धावा तर रायन रिकेल्टन याने 81 धावांची भागीदारी करत 11.5 ओव्हरमध्ये 148 धावांचा टप्पा ओलांडला. या दोघांनी केलेल्या 148 धावांमुळे इतर खेळाडूंना पुढचे लक्ष मोडीस पाडणे अधिक सोपे झाले. तसेच सूर्याने 16 आणि तिलक वर्मा याने 20 धावा केल्या. तर कॅप्टन हार्दिक पंड्या आणि नमन धीर यांनी 23 धावांची भागीदारी करत मुंबईला विजयी होण्यासाठी योगदान दिलं. मात्र यावेळी रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही जोडी मुंबईच्या विजयाची शिल्पकार ठरली. यावेळी शार्दुल ठाकुर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. त्यासाठी शार्दुलला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 

हेही वाचा- Hardik Pandya New Car: हार्दिक पांड्याच्या ताफ्यात आणखी एक लक्झरी कार; फेरारीनंतर खरेदी केली 'ही' महागडी कार
केकेआरच्या फलंदाजांचा धमाका
पहिल्या सामन्यात केकेआरला फलंदाजीचा मान मिळाला. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेने 67 धावा आणि अंगकृष रघुवंशीने  51 धावांसह दोघांनी अर्धशतकी कामगिरी केली तर फिन एलन याने 37 धावांची खेळी केली. अखेरच्या क्षणी उपकर्णधार रिंकू सिंहने 33 धावांसह फिनिशिंग टच दिला. यांसह केकेआरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा केल्या.  

हेही वाचा- IPL 2026 MI vs KKR : 14 वर्षांचा 'तो' इतिहास बदलण्यासाठी MI सज्ज; घरच्या मैदानावर केकेआरची धुलाई करणार?
मुंबई इंडियन्सचा 14 वर्षांचा वनवास संपला
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. आतापर्यंत पाच वेळा या संघाने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. मात्र जेव्हा जेव्हा आयपीएलमधील पहिल्या सामन्याची वेळ आली तेव्हा तेव्हा मुंबई इंडियन्स हा संघ अपयशी ठरला आहे. दरम्यान आयपीएल 2026 मधील केकेआरसोबतच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजयासह हा रेकॉर्ड मोडला आहे. मुंबई इंडियन्सने आपला शेवटचा पहिला आयपीएल सामना 2012 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आयपीएल 2026 मध्ये केकेआर विरुद्ध जिंकला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number