IPL 2026 RCB vs DC : अवघ्या 75 धावांत दिल्लीची धूळधाण! आरसीबीने 39 बॉलमध्ये सामना संपवत मिळवला एकतर्फी विजयाचा तडाखा

घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा मानहानीकारक पराभव झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी असा सामना पार पडला.

IPL 2026 RCB vs DC : अवघ्या 75 धावांत दिल्लीची धूळधाण! आरसीबीने 39 बॉलमध्ये सामना संपवत मिळवला एकतर्फी विजयाचा तडाखा

घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा मानहानीकारक पराभव झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी असा सामना पार पडला. हा सामना आयपीएल 2026 च्या हंगामातील विशेष सामना ठरला आहे. अवघ्या 6.3 ओव्हरमध्ये आरसीबीने हा सामना आपल्या नावे केला आहे. दिल्लीच्या घरच्या मैदानावर मोठ्या फरकाने आरसीबीने दिल्लीचा धुव्वा उडवला. सामन्याप्रमाणेच नाणेफेकीचा कौल देखील आरसीबीच्या बाजूने लागला. यावेळी आरसीबीने पहिला गोलंदाजी निवडत दिल्लीच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत पाठवले. तर दिल्ली कॅपिटल्सचा डाव 16.3 ओव्हरमध्ये अवघ्या 75 धावांत संपुष्टात आला. यावेळी आरसीबीने 19 व्या हंगामातील 39 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचा 9 गडी बाद करत विजय मिळवला.  

दिल्लीचा  मानहानीकारक पराभव

प्रथम फलंदाजी करत दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 13 धावांत संघाने 6 गडी गमावले होते. मागच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभा करणारा केएल राहुल यावेळी मात्र फेल ठरला. केएल राहुल आणि नितीश राणा केवळ 1 धाव काढून बाद झाला. तर साहिलसह समीर रिझवी, गोल्डन डक आणि कर्णधार अक्षर पटेल शुन्यावर बाद झाले. तसेच ट्रिस्टन स्टब्स फक्त 5 धावा करू शकला. दिल्लीवर आलेल्या दुष्काळात अभिषेक पोरेल हा कुठे तरी सूर्याचा किरण दिसत होता. अभिषेक पोरेलने 33 चेंडूंमध्ये 30 धावांची खेळी केली, ज्यामुळे दिल्लीला 75 धावांपर्यंत पोहोचता आले. यावेळी दिल्लीकडून एकट्या काइल जेमिसन संघासाठी आरसीबीचा एक गडी बाद करू शकला. 

हेही वाचा- DC vs RCB: दिल्ली कॅपिटल्सची नामुष्की! घरच्या मैदानावर अवघ्या 75 धावांत संपूर्ण संघ ऑलआऊट

आरसीबीच्या गोलंदाजांची कमाल

तर दुसरीकडे दिल्लीने दिलेल्या आव्हानवर आरसीबीचा संघ अवघ्या 39 बॉलमध्ये पुरुन उरला. आरसीबीची सुरुवातच धडाकेबाज झाली. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत जेकॉब बेथेल 20 धावा करून बाद झाला. तर देवदत्त पडीक्कल हा 34 धावांवर नाबाद राहिला. तर किंग कोहली 23 धावा करून नाबाद राहिला. यासह आरसीबीने 6.3 ओव्हर म्हणजेच 39 बॉलमध्ये 9 विकेट राखून मॅच जिंकली. यावेळी आरसीबीच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या विजयाचा पाया रचला. जोश हेझलवूडने  भेदक माऱ्याने दिल्लीचे 4 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमारने 3 बळी घेतले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिलं स्थान पटकावलं आहे. भुवीकडे सध्या पर्पल कॅप आहे. भुवनेश्वर कुमार याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध एकूण 3 विकेट्स मिळवल्या. भुवीने या 3 ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा दिल्या. भुवीने यासह पर्पल कॅप पटकावली. 

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी या सामन्यानंतर पॉइंट टेबलकडे सर्वांच लक्ष वेधलं गेल. या सामन्यानंतरही दोन्ही संघांच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या विजयानंतर आरसीबीच्या नेट रनरेटमध्ये कमालीची वाढ झाली असून दिल्लीला फटका बसला आहे. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे तर आरसीबी सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी होता आणि सामन्यानंतर ही दुसऱ्या स्थानीच आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number