IPl 2025 स्थगित, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI ने IPL 2025 स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी चर्चा करून BCCI ने उर्वरित सामने तात्पुरते स्थगित केले आहेत.

IPl 2025 स्थगित, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय

मुंबई – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. BCCI ने IPL 2025 स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारशी चर्चा करून BCCI ने IPL 2025 चे उर्वरित सामने तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने क्रिकेटसारख्या खेळाचे आयोजन योग्य वाटत नाही, असे BCCI च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर तणाव वाढला आहे. काल गुरूवारी रात्री पाकिस्तानने ड्रोन द्वारे भारतावर हल्ला केला होता. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा ड्रोन हल्ला हाणून पाडला. त्यानंतर भारतीय वायू दल आणि नौदल पाकिस्तानवर तुटून पडले. पाकिस्तानच्या अनेक भागात भारतीय सैन्यानी जोरदार हल्ला चढवला. यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये IPL 2025 स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. काल गुरूवारी असलेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना अर्ध्यातून थांबवण्यात आला होता. आज IPL बाबतीत निर्णय घेतला जाणार होता. यात त्यांनी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2025 चा अंतिम सामना 25 मे रोजी कोलकाता येथे खेळवला जाणार होता. मात्र आता तो सामना आणि उर्वरित सामने रद्द करण्यात आले आहेत. याआधी पाकिस्तान सुपर लीगचे (PSL) उर्वरित सामने देखील तणावामुळे यूएईमध्ये हलवण्यात आले आहेत.

धर्मशाळा सामना अर्धवट थांबवला

काल गुरुवारी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील IPL 2025 चा 58वा सामना सुरू होता. पंजाब किंग्जने 10.1 षटकात 1 बाद 122 धावा केल्या होत्या. याचवेळी मैदानातील एक फ्लडलाइट बंद झाली आणि नंतर हळूहळू सगळ्या फ्लडलाइट्स बंद करण्यात आल्या. प्रेक्षकांना तात्काळ सुरक्षितपणे मैदानाबाहेर काढण्यात आले होते.

ड्रोन हल्ल्यामुळे तातडीचा निर्णय

धर्मशाळा परिसरातील जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथे पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. यामुळे या शहरांमध्ये ब्लॅकआउट घोषित करण्यात आले. भारतानेही तत्काळ प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या 6 क्षेपणास्त्रांचा नाश केला आणि अनेक ड्रोन पाडले. आता या तणावामुळे BCCI ने IPL 2025 चे उर्वरित सामने तात्पुरते स्थगित केले आहेत.  

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number