IPL 2025: हार्दिक पांड्या पहिला सामना खेळणार नाही, मुंबईच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडं?

हार्दिक पांड्याला स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तो IPL २०२५ च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी मुंबईने नवा कर्णधार निवडला आहे.

IPL 2025: हार्दिक पांड्या पहिला सामना खेळणार नाही, मुंबईच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडं?

IPL च्या १८ व्या हंगामाची सुरुवात २२ मार्चपासून होत आहे. या हंगामात २३ मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. उभय संघातील हा सामना क्रिकेट रसिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. पण या सामन्याला मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या मुकणार आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे.

 

हार्दिक पांड्याला आयपीएल २०२४ मधील अखेरच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. या परिस्थितीत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे द्यावी, हा प्रश्न उपस्थित झाला होता.

पत्रकार परिषदेत कर्णधाराविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा हार्दिक पांड्याने उत्तर देताना सांगितलं की, त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्व करणार आहे. हार्दिक पंड्या या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, ‘सूर्यकुमार यादव भारतीय संघाचेही नेतृत्त्व करतो. त्यामुळे आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व तोच करणार आहे.’

हेही वाचा – IPL 2025: सलमान, शाहरुख, प्रियंका चोप्रासह बॉलिवूडचा जलवा? ओपनिंग सेरेमनीत स्टार्सची मांदियाळी

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहची भूमिका

मुंबई इंडियन्स संघात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह सारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तरीदेखील व्यवस्थापनाने एका सामन्यात सूर्यकुमार यादवला कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला आहे.  

 

हेही वाचा –  IPL संघ कोण विकत घेऊ शकतो? एक संघ खरेदीसाठी किती पैसे लागतात

आयपीएल २०२५ साठी असा आहे मुंबईचा स्क्वॉड  

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number