भारताच्या इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी नॅनो लिक्विड युरिया निर्मितीस सुरुवात केली आहे. या नॅनो लिक्विड युरियाची मागणी परदेशातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारताने दोन विमानांच्या साहाय्याने श्रीलंकेला १०० टन नॅनो लिक्विड युरियाचा पुरवठा केला आहे. अशी माहिती श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी टविट केले की, ‘दिवाळी सणाच्या दिवशी भारतीय हवाई दल श्रीलंकेसाठी आशेचा किरण घेऊन आला आहे. श्रीलंकेने भारताकडे तातडीने युरियाची मागणी केली होती. आणि भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांच्या माध्यमातून १०० टन नॅनो लिक्विड युरिया घेऊन कोलंबोला पोहोचले.’ असे ट्वटि भारतीय उच्चायुक्तांनी केले आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी रासायनिक खतांच्या आयातीवर निर्बंध लादले होते. त्यामुळे श्रीलंकेमध्ये नॅनो युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. त्यासाठी श्रीलंकेने भारताकडे नॅनो युरियाची तातडीने मागणी केली. भारताने हवाई दलाच्या दोन विमांनांनी श्रीलंकेला १०० टन नॅनो लिक्विड युरियाचा पुरवठा केला आहे.