भारताची हरनाज कौर सिंधू ठरली ‘मिस युनिव्हर्स २०२१’

भारताची हरनाज कौर संधू हिने यंदाचे ‘मिस युनिव्हर्स २०२१’चे विजेतेपद पटकावले आहे. तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब जिंकला आहे. भारताची सौंदर्यवती हरनाज संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली आहे. यंदा ‘मिस युनिव्हर्स २०२१’ ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली. हरनाजच्या आधी २००० मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने हा खिताब जिंकला होता. मिस […]

भारताची हरनाज कौर सिंधू ठरली ‘मिस युनिव्हर्स २०२१’

भारताची हरनाज कौर संधू हिने यंदाचे ‘मिस युनिव्हर्स २०२१’चे विजेतेपद पटकावले आहे. तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब जिंकला आहे. भारताची सौंदर्यवती हरनाज संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली आहे.

यंदा ‘मिस युनिव्हर्स २०२१’ ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली. हरनाजच्या आधी २००० मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने हा खिताब जिंकला होता. मिस युनिव्हर्स या स्पर्धेत ७५हून अधिक सुंदर आणि प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. त्यातील तीन देशातील सौंदर्यवतींनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले. या टॉप ३ मध्ये दक्षिण आफ्रिका, पॅराग्वे आणि भारत या देशातील सौदर्यवतींचा समावेश होता. यात यात दक्षिण आफ्रिका, पॅराग्वे या दोन्ही सौंदर्यवतींना मागे टाकत भारताच्या हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब आपल्या नावी केला आहे.

हरनाज संधूच्या नावी असलेलेल खिताब

२०१७ – टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड

२०१८ – मिस मॅक्स इमर्जिंग स्टार

२०१९ – फेमिना मिस इंडिया पंजाब

२०२१ – मिस युनिवर्स इंडिया

हरनाज संधू ही एक मॉडेल असून पंजाबी चित्रपटात देखील हरनाज झळकली आहे. ‘यारा दियां पू बारां’, ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात हरनाज मुख्य भूमिकेत झळकली आहे. मिस युनिवर्स इंडिया २०२१ या खिताबासह हरनाजने अनेक सौदर्य खितांबांवर नाव कोरले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number