Suryakumar Yadav : "कित्येक क्रिकेटर्स माझ्या मागे, सूर्यकुमार यादव तर…" बोल्ड अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे सूर्याकुमार यादव पुन्हा चर्चेत

भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. बोल्ड अभिनेत्री आणि मॉडल खुशी मुखर्जीने सोशल मीडियावर बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

Suryakumar Yadav : &quotकित्येक क्रिकेटर्स माझ्या मागे, सूर्यकुमार यादव तर…&quot बोल्ड अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे सूर्याकुमार यादव पुन्हा चर्चेत

भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने जानेवारीत खेळवल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्ध पाच टी20 सामन्यात टीम इंडियाचे कर्णधार म्हणून नेतृत्त्व केले. त्यानंतर तो 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. एवढच नव्हे तर जानेवारीच्या सुरुवातीला तो मुंबईसाठी विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेतील दोन सामन्यांसाठी मोठ्या धावांसाठी संघर्ष करताना दिसतो आहे. असं असताना भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

हेही वाचा- Year Ender 2025 : यंदाच्या वर्षी ‘या’ गोलंदाजांचा राहिला दबदबा; सर्वाधिक विकेट्स घेतलेले टॉप 10 खेळाडू

बोल्ड अभिनेत्री आणि मॉडल खुशी मुखर्जीने सोशल मीडियावर बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. अलिकडेच खुशी मुखर्जी तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली. यानंतर आता तिने सूर्यकुमार यादवबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोशल मीडियावर माध्यमांशी बोलताना खुशी मुखर्जीने असा दावा केली आहे की, सूर्यकुमार यादव तिला खूप मेसेज करायचा. तिच्या या टिप्पणीमुळे तिच्या आणि सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे.

तिला माध्यमांकडून विचारण्यात आले होते की, तुला जर कोणत्या क्रिकेटपटूसोबत डेटवर जाण्याची संधी मिळाली तर तु कोणा सोबत जाण निवडशील? यावर उत्तर देताना खुशी मुखर्जी म्हाणाली की, “कित्येक क्रिकेटर्स माझ्या मागे लागलेले… अनेक क्रिकेटपटू माझ्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सूर्यकुमार यादव तर मला खूप मेसेज करायचा, पण आता आमचं जास्त बोलणं होत नाही… मला त्याच्याशी जोडलं जायचं नाही, मला माझ्यासोबत कोणत्याही लिंक-अपमध्ये रस नाही. त्यामुळे खरं तर कोणताही लिंक-अप नाहीये… ” 

हेही वाचा- MS Dhoni Video Viral : धोनीच्या गाडीत ‘ते’ पाकीट पाहून चाहते नाराज! सलमान खानच्या पार्टीला जातानाचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, मुखर्जीने तिला कोणत्याही प्रकारचे लिंक-अप आवडत नसल्याचे सांगितले. तिने हे देखील सांगितले की ती तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवण्यास प्राधान्य देते. दरम्यान तिने केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खुशी मुखर्जी ही तिच्या बोल्डलूकमुळे आणि आगळ्या वेगळ्या पोशाखामुळे चर्चेत असते. तिचा जन्म कोलकाता येथे 24 नोव्हेंबर 1996 रोजी झाला. मोठ्या ब्रेकनंतर ती भारतीय टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहचली. यावेळी तिने एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सव्हिला 10’ आणि ‘लव्ह स्कूल 3’ मध्ये भाग घेतला. ती बालवीर रिटर्न्समधील ज्वाला परी आणि पौराणिक नाटक ‘कहत हनुमान जय श्री राम’ सारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये देखील दिसली आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number