दुबई: 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू झाला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा अंतिम सामना आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच, किक्रेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अशातच, किक्रेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी, टॉस प्रेझेंटेशनमध्ये दोन कर्णधारांसाठी वेगवेगळे प्रेझेंटर नियुक्त करण्यात आले होेते. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवची मुलाखत रवी शास्त्री यांनी घेतली, तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांची मुलाखत वकार युनूस यांनी घेतली.
India choose the chase with the ? on the line ?? Watch the Asia Cup Final LIVE NOW on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 #INDvPAK pic.twitter.com/eL6Wmizh81 — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 28, 2025
‘या’ कारणामुळे दोन वेगवेगळे प्रेझेंटर नियुक्त करण्यात आले
यादरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकूमार यादवने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, अनेकांना प्रश्न पडला की, दोन कर्णधारांसाठी वेगवेगळे प्रेझेंटर का नियुक्त करण्यात आले? याचे अधिकृत कारण काय होते? मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, हे स्पष्ट आहे की, भारताने हात मिळवणी करण्यास नकार दिल्यानंतर, पाकिस्तानने सांगितले की ते भारतीय प्रेझेंटरर्सशी संवाद साधणार नाही. यामुळे, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात दोन कर्णधारांसाठी वेगवेगळे प्रेझेंटर नियुक्त करण्यात आले. या सामन्यात, रिची रिचर्डसन यांनी मॅच रेफरी म्हणून काम पाहिले.