India-Pakistan Match: भारत-पाक सामना पाहायचायं? फक्त 438 रुपयांत तिकीट! घरबसल्या बुकिंगची सोपी प्रक्रिया जाणून घ्या

टी-20 वर्ल्ड कपसाठीची तिकीट विक्री सुरू झाली असून भारत-पाक सामन्याचं तिकीट फक्त 438 रुपयांना उपलब्ध आहे

India-Pakistan Match: भारत-पाक सामना पाहायचायं? फक्त 438 रुपयांत तिकीट! घरबसल्या बुकिंगची सोपी प्रक्रिया जाणून घ्या

India Pakistan match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे चाहत्यांसाठी सणासुदीचीच वेळ. विशेषत: वर्ल्ड कप असला की या महा-सामन्याची क्रेझ तर आकाशाला भिडलेली दिसते. येत्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही असाच जल्लोष पाहायला मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये भारत आणि श्रीलंकेत मिळून ही स्पर्धा पार पडणार आहे. चाहत्यांची उत्सुकता वाढवणारी गोष्ट म्हणजे या स्पर्धेच्या तिकिटांची विक्री अधिकृतपणे सुरू झाली आहे आणि यावेळी किंमतीही अतिशय परवडणाऱ्या ठेवण्यात आल्या आहेत.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार काही सामन्यांची तिकिटे अवघ्या 100 रुपयांपासून उपलब्ध आहेत. श्रीलंकेत मात्र तिकीटांची सुरुवातीची किंमत 1,000 श्रीलंकन रुपये ठेवण्यात आली आहे. आयसीसीच्या स्पर्धांमधील हा तिकीट दर आतापर्यंतचा सर्वात कमी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.

भारत-पाक सामन्याचं तिकीट कितीला मिळेल?

क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट कितीला मिळणार? 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणाऱ्या या महामुकाबल्याचे तिकीट फक्त 438 रुपये (1,500 श्रीलंकन रुपये) इतक्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या किमतीने सामना पाहायला मिळणं ही चाहत्यांसाठी मोठी संधीच म्हणावी लागेल.

तिकीट विक्री गुरुवार, 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.45 वाजल्यापासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली. विक्री सुरू होताच बुकिंग प्लॅटफॉर्मवर चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून अनेक सामन्यांची तिकिटे जलद गतीने 'सोल्ड आऊट' होत आहेत.

घरबसल्या तिकीट कसं बुक कराल?

तिकीट बुकिंगची प्रक्रिया अतिशय सोपी ठेवण्यात आली आहे. यासाठी BookMyShow वर तिकीट उपलब्ध आहेत. जर तुम्ही सामना पाहण्याचा विचार करत असाल, तर पुढील स्टेप्स फॉलो करा:

  1. BookMyShow ऍप किंवा वेबसाइट उघडा.
    तुमचं अकाऊंट असेल तर लॉग इन करा. नसल्यास काही सेकंदांत नवं अकाऊंट तयार करून ओटीपीद्वारे व्हेरिफाइ करा.

  2. होमपेजवर दिसणाऱ्या ‘T20 World Cup’ टॅबवर क्लिक करा.

  3. तुम्हाला पाहायचा असलेला सामना आणि शहर निवडा.
    भारताच्या सामन्यांची माहिती ‘India Matches’ सेक्शनमध्ये उपलब्ध आहे.

  4. तिकीट सेल लाईव्ह होईपर्यंत पेज रिफ्रेश करत राहा.
    भारत-पाक सामन्याचे तिकिटे काही मिनिटांतच संपण्याची शक्यता असल्याने हा टप्पा महत्त्वाचा आहे.

  5. तिकीट उपलब्ध झाल्यावर सीट सिलेक्ट करा आणि बुकिंग पूर्ण करा.

  6. कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला M-तिकीट मिळेल, जे सामना सुरू होण्याआधी ऍक्टिव्हेट होतं. हेच तिकीट स्टेडियममध्ये प्रवेशासाठी पुरेसं असतं.

भारत-पाक सामना पाहण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. यावेळी तिकीट दर परवडणारे असल्याने आणि बुकिंग प्रक्रिया सोपी असल्याने हजारो भारतीय चाहत्यांना ही संधी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही हा रोमांचक सामना स्टेडियममध्ये पाहायचा असेल, तर तिकिटे संपण्याआधी लगेच बुकिंग करून घ्या!

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number