Ind v Pak Women World Cup 2025 : महिला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची हार! भारताने 88 धावांनी मिळवला विजय

पाकिस्तान महिला संघाला अद्याप एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवता आलेला नाही.

Ind v Pak Women World Cup 2025  : महिला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची हार! भारताने 88 धावांनी मिळवला  विजय

भारतीय संघाने आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर, टीम इंडियाने पाकिस्तानला 88 धावांनी पराभूत करून विजयी घोडदौड सुरू ठेवली. यासह, भारताने सलग 12 व्यांदा पाकिस्तानला हरवून आपला एकदिवसीय विक्रम कायम ठेवला. तसेच विश्वचषकात पाकिस्तान महिला संघावर सलग पाचवा विजय नोंदवला. पाकिस्तान महिला संघाला अद्याप एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवता आलेला नाही.

महिला विश्वचषकाच्या सहाव्या सामन्यात 247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान महिला संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी फक्त 26 धावांत तीन विकेट गमावल्या. त्यानंतर सिद्रा अमीन आणि नतालिया परवेझ यांनी चौथ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी करून डावाला नवसंजीवनी दिली, परंतु नतालिया बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव पूर्णपणे कोसळला.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी ५४ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. भारताची गोलंदाज क्रांती गौड हिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number