आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 चा दुसरा उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यातील विजेता संघ रविवार, 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात पहिल्या उपांत्य फेरीतील विजेत्या न्यूझीलंडशी सामना करेल. आज फलंदाजी करत भारताने इंग्लंडसमोर 254 धावांचे आव्हान उभे केले आहे.
254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. पॉवरप्लेमध्ये त्यांनी तीन विकेट गमावल्या. सलामीवीर फिल सॉल्टला तीन चेंडूत फक्त पाच धावा करता आल्या. कर्णधार हॅरी ब्रुक सहा चेंडूत सात धावा काढून बाद झाला.