नाशिकमध्ये सराफा व्यवसायिकावर आयकरचा छापा

नाशिकमध्ये सराफा व्यवसायिकावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात २६ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये सराफा व्यवसायिकावर आयकरचा छापा

नाशिक : नाशिकमध्ये सराफा व्यवसायिकावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात २६ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. सलग तीन तास आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. नाशिक शहरातील सराफ व्यवसायिकाकडे गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ३० तासांपासून तपासणी सुरू आहे. एकाच ज्वेलर्सच्या दोन दालनांमध्ये तपासणी सुरु होती. नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकातील ५० अधिकाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली. या छापेमारीत बंगल्यातील फर्निचर फोडून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटा काढल्या.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number