आज आयपीएल 2026 च्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता आरसीबी आणि गुजरातच्या चाहत्यांसोबतच संपूर्ण क्रिकेटविश्वातील चाहत्यांना लागली आहे. या सामन्यातून आयपीएल 2026 मधील पहिला फायनलिस्ट संघ मिळणार आहे. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वालिफायर-1 धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.
हेही वाचा- IPL 2026 Playoffs : अखेर आयपीएल 2026 मधील प्लेऑफचे 4 संघ ठरले; पहिला सामन्यासह अंतिम सामना कधी? पाहा वेळापत्रक
मात्र या सामन्यापूर्वी एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. आरसीबीकडे सामना न खेळताही थेट फायनलमध्ये पोहचण्याची सुवर्णसंधी आहे. तर बीसीसीआयच्या एका नियमामुळे गुजरात टायटन्सची चिंता वाढण्याची शक्यता आहे. सध्या देशातील अनेक राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली आहे. अशातच धर्मशालामध्ये आज 80 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जर जोरदार पावसाची हजेरी लागली तर हा सामना रद्द करावा लागू शकतो. या सामन्यात पावसाचा चांगला फायदा हा आरसीबीला होऊ शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचे गुण 18-18 इतके आहेत. मात्र आयपीएलच्या लीग स्टेजमध्ये गुणतालिकेत नुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ पहिल्या स्थानावर आहे, आणि आयपीएलच्या नियमानुसार गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेला संघ आयपीएल फायनलमध्ये पोहोचेल. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. तर, गुजरात टायटन्सला क्वालिफायर-2 चा सामना खेळावा लागेल. दरम्यान कोणता संघ आयपीएल फायनलमध्ये पोहोचणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.