‘मिनी वर्ल्डकप’ अशी ओळख असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा या स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडं आहे. मात्र, बीसीसीआयनं भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यामुळं भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.
8 संघ विजेतेपदासाठी झुंजणार
ही स्पर्धा 8 संघांमध्ये खेळवली जात आहे. यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. भारतीय संघ ‘अ’ गटात असून भारतीय संघाची लढत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी होणार आहे. तर ‘ब’ गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.
हेही वाचा – Champions Trophy 2025: हेच ४ संघ पोहोचणार सेमीफायनलमध्ये, दिग्गजांचा अंदाज
यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जात आहे. सर्व संघांचे सामने पाकिस्तानमधील कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे रंगणार आहेत. तर भारतीय संघाचे सर्व सामने दुबईतच पार पडणार आहेत. भारत सेमी फायनल आणि फायनलमध्ये पोहोचल्यास हे सामनेही देखील दुबईतच होणार आहेत.
हेही वाचा – Team India Record in Dubai: दुबईत टीम इंडियाला हरवणं कठीण! ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड बघाच
याआधी 2017 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन ट्रॉफी झाली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानने पराभव करत विजेतेपद मिळवले होते. यंदा दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने येणार का?, याकडं सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलं आहे. भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईत रंगणार आहे.
चॅम्पियन ट्रॉफीसाठी असा आहे भारतीय संघ
असे आहे चॅम्पियन ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक: