राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भाजप राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. विनोद तावडे यांची भाजप सरचिटणीसपदी बढती केल्यामुळे तावडे यांचा राष्ट्रीय स्तरावरील दबदबा वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत नव्या जबाबदारीबद्दल आभार मानले आहेत.
माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भाजप राष्ट्रीय सरचिटणीसपदी वर्णी लागली. त्यामुळे याबाबत विनोद तावडे यांनी मिळालेल्या नव्या जबाबदारीबद्दल आभारी असल्याचे सांगितले. सक्षम विरोधीपक्ष लोकशाहीला बळकट करतो, त्यामुळे मला मिळालेली भाजप राष्ट्रीय सरचिटणीसपदाची नवी जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडणार असल्याचे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले आहे. तसेच मी कामात रमणारा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे विनोद तावडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा वर्तवली जात होती. मात्र आता भाजप राष्ट्रीय सरचिटणीसपदी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत आता विनोद तावडे यांचाही दबदबा राहणार आहे.