फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री वळसे यांचे उत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज पुन्हा फडणवीसांनी एक पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केला. त्यामुळे फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का? असा सवाल दिलीप वळसे-पाटील यांनी उपस्थित केला  आहे. तसेच पेनड्राईव्ह प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी वळसे-पाटील यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित […]

फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री वळसे यांचे उत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज पुन्हा फडणवीसांनी एक पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केला. त्यामुळे फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का? असा सवाल दिलीप वळसे-पाटील यांनी उपस्थित केला  आहे. तसेच पेनड्राईव्ह प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी वळसे-पाटील यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत गृह विभागावर टीका केली आहे. त्यावर दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तरे दिले आहेत. फडणवीसांचे पेनड्राईव्ह प्रकरण तपासावे लागेल. या घटनेच्या मागे कोण आहे आणि ही घटना कशापद्धतीने पुढे घेऊन जायची, यात कोण संबंधित आहेत. त्याच्यावर काय कारवाई करायची हे पाहावे लागेल, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक प्रकरण सीबीआयकडे पाठवण्याची आवश्यकता नसल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले आहेत. १९९३चे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण खूप जुने असल्याचेही ते म्हणाले. तसेच फडणवीसांचे पेनड्राईव्ह प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणीही दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number