विदर्भात गेल्या काही दिवसात विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावतीमध्ये चांगलाचं पाऊस पडला आहे. यामुळे काही महामार्ग बंद पडले आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे.
भंडारा
– वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
– गोसेखुर्द प्रकल्पातील संपूर्ण ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले
– ३२६८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु
– भंडारा – गडचिरोली जिल्ह्यातील १५४ गावांना सतर्कतेचा इशारा
गडचिरोली
– गडचिरोली जिल्हात अतिवृष्टीचा इशारा
– ९ सप्टेबंरपर्यंत सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी
– भामरागड तालुक्यातील १०० गावांचा संपर्क तुटला आहे
वर्धा
– जिल्हातल्या सर्व नदी, नाल्यांना पूर आला आहे.
– १० प्रकल्प तूंडूब भरलेत.
– पोथरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, आजूबाजूच्या गावातील घरात पाणी शिरलं
नागपूर
– गेल्या ४८ तासात नागपूर जिल्हात पाऊस सुरु
– उमरेड तालुक्यात नाल नदिला पूर आल्याने हिंगणघाट-उमरेड महामार्ग ठप्प
अमरावती
-गेल्या ३ दिवसापासून मुसळधार पाऊस
– नलदयमंत्री नदिला पूर, मोर्शी तालुक्यात पूर सदृष्य स्थिती,