Gujrat Earthquake: एकामागून एक सात धक्के; राज्याच्या ‘या’ तीन शहरांत भूकंपाच्या भीतीचं सावट

आकडेवारीनुसार, पहिला धक्का काल रात्री 8.43 वाजता बसला असून त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.3 इतकी होती. या धक्क्याचे केंद्र उपलेटापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर होते.

Gujrat Earthquake: एकामागून एक सात धक्के; राज्याच्या ‘या’ तीन शहरांत भूकंपाच्या भीतीचं सावट

गुजरातमधील जेतपूर, धोराजी आणि उपलेटा या पंथकात आज शुक्रवार (9 जानेवारी) पहाटेपासून भूकंपाचे सलग धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च (Institute of Seismological Research, ISR) च्या माहितीनुसार, गेल्या 12 तासांत या भागात एकूण सात भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले आहेत.

ISR च्या आकडेवारीनुसार, पहिला धक्का काल रात्री 8.43 वाजता बसला असून त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.3 इतकी होती. या धक्क्याचे केंद्र उपलेटापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर आज सकाळी 6.19 वाजता सर्वाधिक तीव्रतेचा 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला.

सकाळी 6.19 ते 8.34 या कालावधीत सलग धक्के जाणवले. सकाळी 6.56 वाजता 2.9, 6.58 वाजता 3.2, 7.10 वाजता 2.9, 7.13 वाजता 2.9, 7.33 वाजता 2.7 तीव्रतेचे धक्के बसले, तर 8.34 वाजता पुन्हा एक सौम्य धक्का जाणवला. सर्व धक्क्यांचे केंद्र उपलेटाच्या पूर्व-उत्तर-पूर्व दिशेला 27 ते 30 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाची खोली जमिनीखाली 6.1 ते 13.6 किलोमीटर दरम्यान होती.

हेही वाचा: Lalremruata Passed Away : चालू किक्रेट सामन्यात खेळाडूला झाला श्वसनाचा त्रास, क्षणार्धात खेळाडू कोसळला; रणजीपटूचं निधन

सुदैवाने, या भूकंपांमध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, वारंवार धक्के बसल्यामुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, राजकोट जिल्ह्यातील धोराजी शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक खासगी शाळांनी आजचा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. सकाळी शाळेत पोहोचलेली मुलेही तातडीने घरी पाठवण्यात आली.

भूकंपाच्या दृष्टीने गुजरात हा संवेदनशील प्रदेश मानला जातो. कच्छ फॉल्ट, कॅट्रोल हिल्स फॉल्ट आणि नलिया फॉल्ट अशा अनेक भूकंपीय रेषांवर हा भाग वसलेला आहे. तसेच भारतीय टेक्टॉनिक प्लेट युरेशियन प्लेटकडे सरकत असल्याने या ताणाचा परिणाम गुजरातपर्यंत पोहोचतो. कच्छचा रण हा भूवैज्ञानिकदृष्ट्या ‘रिफ्ट झोन’ असल्याने या भागात सौम्य ते मध्यम भूकंप वारंवार होण्याची शक्यता कायम असते.

हेही वाचा: Nasa Space Mission: स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीराची प्रकृती बिघडली; NASA ला इतिहासात पहिल्यांदाच घ्यावा लागला 'हा' मोठा निर्णय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number