आयपीएल 2026 चा हंगाम चांगलाच रंगलेला पाहायला पाहायला मिळत आहे. पॉईंट टेबलमध्ये वरचढ राहण्यासाठी संघांमध्ये चुरस रंगली आहे. अशातच 3 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात गुजरातने 4 गडी राखून पराभव केला. नाणेफेकीचा कौल जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंजाबने दिलेल्या 164 धावांचे आव्हान पूर्ण करत गुजरातने 6 बाद अन् 19.5 ओव्हरमध्ये 167 धावा करत घरच्या मैदानावर विजयी झेंडा फडकवला.
प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्सकडून प्रियांश आर्य आणि कूपर कोन्नोली यांनी हवी तशी सुरुवात करून दिली नाही. ज्यामुळे सुरुवातीला पंजाबची 2 धावा आणि 2 गडी बाद अशी परिस्थिती पाहायला मिळाली. त्यानंतर प्रभसिमरन सिंग 15 धावा आणि श्रेयस अय्यर 19 धावा केल्या. तर दुसरीकडे नेहल वढेरा गोल्लडन डकवर बाद झाला. झेव्हियर बार्टलेट देखील आला तसा माघारी फिरला.
त्यामुळे पंजाब अडचणीत आला होता. असं असताना सूर्यांश शेडगे आणि मार्कस स्टोयनिस या दोघांनी पंजाबला पुन्हा उभ केलं. सूर्यांशने 29 बॉलमध्ये 57 धावा आणि मार्कस स्टोयनिस 40 धावा अशी भागीदारी करत दोघांनी 79 धावांची खेळी खेळली. तर गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग आणि विजयकुमार वैशाक या दोघांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर मार्कस स्टोइनिस याने 1 बळी घेतला.
पंजाबने दिलेल्या 164 धावांचा पाठलाग करत गुजरात टायटन्सकडून शुबमन गिलने 5 धावा केल्या तर जोस बटलरने 26 धावांची खेळी खेळली. त्यामुळे पावरप्लेमध्ये गुजरातचा संघ बॅकफूटवर गेला. त्यानंतर निशांत सिंधू 15 धावा करत तंबूत परतला. राहुल तेवतियाही फक्त 2 धावा करून बाद झाला. साई सुदर्शनने जोरदार प्रदर्शन दाखवले. त्याने 41 बॉलमध्ये 57 धावांचा खेळी खेळली, यावेळी त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारले. 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज असताना वॉशिंग्टन सुंदरने षटकार मारला. गुजरातच्या या विजयात जेसन होल्डर आणि साई सुदर्शनने महत्त्वाची भूमिका बजावली.