पुण्यात महाराजांना कलाकृतीद्वारे अभिवादन

शिवजन्मभूमी म्हणजेच पुण्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची थ्रीडी प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली. शिवजयंती निमित्त महाराजांना कलाकृतीद्वारे अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची इतकी मोठी थ्रीडी रांगोळी प्रथमच साकारण्यात आली असल्याचा दावा करण्यात येत आहे. ६५हून अधिक कलाकारांनी सलग तीन दिवस परिश्रम घेत महाराजांची प्रतिमा साकारली आहे. शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या तीस […]

पुण्यात महाराजांना कलाकृतीद्वारे अभिवादन

शिवजन्मभूमी म्हणजेच पुण्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची थ्रीडी प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली. शिवजयंती निमित्त महाराजांना कलाकृतीद्वारे अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची इतकी मोठी थ्रीडी रांगोळी प्रथमच साकारण्यात आली असल्याचा दावा करण्यात येत आहे.

६५हून अधिक कलाकारांनी सलग तीन दिवस परिश्रम घेत महाराजांची प्रतिमा साकारली आहे. शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या तीस हजार चौरस फूट प्रांगणात, बारा टन रांगोळीचा वापर करत ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. या थ्रीडी रांगोळीत शिवाजी महाराज आणि राजमुद्रेला आज्ञापत्रावर स्थान देण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number