सामूहिक बलात्कार करुन महिलेची हत्या

नागपूर जिल्ह्यातील सुरेवानी गावात एक निंदनीय घटना घटना घडली आहे. या घटनेत तन आरोपी सामील होते. या तिघांनी वेळ साधत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तातडीने तपास करत या तीनही आरोपींना अटक केली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभना (३५) ही महिला सुरेवानी गावातील रहिवाशी होती. तिच्या पतीला वाघाच्या शिकारीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. तो […]

सामूहिक बलात्कार करुन महिलेची हत्या

नागपूर जिल्ह्यातील सुरेवानी गावात एक निंदनीय घटना घटना घडली आहे. या घटनेत तन आरोपी सामील होते. या तिघांनी वेळ साधत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तातडीने तपास करत या तीनही आरोपींना अटक केली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभना (३५) ही महिला सुरेवानी गावातील रहिवाशी होती. तिच्या पतीला वाघाच्या शिकारीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. तो सध्या कारागृहात असल्याने ती शेतीची कामे करत होती. घरी एकटीच राहत असल्यामुळे वासनांध आरोपी आबू ऊर्फ दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील यांची तिच्यावर वाईट नजर होती.

पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. पीडिता एकटी असल्याचे पाहून आरोपी तिच्याकडे गेले, आणि महिलेकडे शरीरसुखाची मागणी करू लागले. मात्र महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करत तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर देखील हे आरोपी थांबले नाहीत. त्यांनी महिलेची धारधार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ही महिलेवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार आरोपींनी केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी कारवाई सुरु केली. पोलिसांनी तातडीने तपास करत या तीनही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number