Harbhajan Singh and Shahnawaz Dahani Handsshake : आधी विरोध आता हस्तांदोलन, भज्जीच्या डोक्यात नेमकं काय सुरु आहे?

19 नोव्हेंबर रोजी अबू धाबी टी10 लीगमध्ये एक धक्कादायक दृष्य पाहायला मिळाले आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी याच्यासोबत हस्तांदोलन करताना दिसला.

Harbhajan Singh and Shahnawaz Dahani Handsshake : आधी विरोध आता हस्तांदोलन, भज्जीच्या डोक्यात नेमकं काय सुरु आहे?

19 नोव्हेंबर रोजी अबू धाबी टी10 लीगमध्ये एक धक्कादायक दृष्य पाहायला मिळाले आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी याच्यासोबत हस्तांदोलन करताना दिसला. हरभजन सिंगच्या या कृतीमुळे क्रिकेटप्रेमींकडून त्याच्यावर टीकांची झोड पडत आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप आणि इतर स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान संघ हस्तांदोलन करण्यावरून मौन होते. पहलगाम हल्ल्याची घटना डोळ्यासमोर ठेवता टी-20 आशिया कपमध्येही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले नाही.

तसेच भारतीय खेळाडूंनी आशिया कप आणि रायझिंग स्टार आशिया कप सारख्या अलिकडच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंपासून अंतर राखले आहे. एवढचं नव्हे तर स्वतः हरभजन सिंगने यापूर्वीही पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट संबंधांना विरोध करणारी अनेक विधाने केली आहेत. संबंध नीट होईपर्यंत खेळ आणि व्यवसाय दोन्ही बंद करावेत असे त्यांनी म्हटले आहे. मात्र अबू धाबी टी10 लीगमध्ये हरभजन सिंगने पाकिस्तानच्या खेळाडूसोबत हस्तांदोलन केल्यामुळे त्यांनी केलेल्या विधानांवर ते स्वतः उलट फिरले आहेत. 

हरभजन आणि दाहानी यांच्यातील हस्तांदोलन
अबू धाबी टी10 लीगमध्ये नॉर्दर्न वॉरियर्स आणि एस्पिन स्टॅलियन्सचा सामना पार पडत होता. त्यावेळेस हरभजन सिंग एस्पिन स्टॅलियन्सचा कर्णधार आणि सदस्य होता तर दुसरीकडे, शाहनवाज दहानी हा नॉर्दर्न वॉरियर्सचा सदस्य होता. त्यावेळेस सामना संपायचा वेळेस हरभजन सिंगने नॉर्दर्न वॉरियर्स संघाच्या सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या समोर आलेल्या शाहनवाज दहानीशी याच्यासोबत देखील त्याने हसत हसत हस्तांदोलन केले.

तेच दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्याने स्वतः पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करण्यास विरोध केला होता. संबंध चांगले होईपर्यंत क्रिकेट आणि व्यापार होऊ नये असे त्याने म्हटले होते. आपण पाकिस्तानी क्रिकेटपटूंना महत्त्व देणे थांबवले पाहिजे. असं देखील त्यांनी म्हटलं होत. पण आता मात्र ते स्वत: पाकिस्तानच्या खेळाडूसोबत हस्तांदोलन करताना पाहायला मिळाले. 

अबू धाबी टी10 लीगमध्ये हरभजन सिंग आणि शाहनवाज दहानीच्या खेळीबद्दल बोलायचं झालं तर, नॉर्दर्न वॉरियर्स संघाकडून खेळताना हरभजन सिंगने एक ओव्हर टाकली आणि त्यात अवघ्या 8 धावा दिल्या. तर दुसरीकडे नॉर्दर्न वॉरियर्सच्या विजयाचा हिरो शाहनवाज दहानी होता, त्याने 2 षटकांत 10 धावा देत 2 बळी घेतले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number