कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येचा थरारक उलगडा

कर्नाटकचे माजी DGP ओम प्रकाश यांची पत्नी व मुलीनेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड; घरगुती वादातून 10 वेळा भोसकून हत्या, मुलाने दिली पोलिसांत तक्रार.

कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येचा थरारक उलगडा

बंगळुरू :कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (DGP) ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही हत्या कुण्या बाहेरच्यांनी नव्हे, तर घरच्या घरी, त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या उपस्थितीत घडल्याचं उघडकीस आलं आहे. पत्नी पल्लवीनेच हत्या केल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या मुलीचा सहभागही या क्रूर प्रकारात असल्याचा आरोप आहे. ओम प्रकाश यांच्या मुलाने पोलिसांकडे आपली आई आणि बहिणीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

कसा झाला खून?

ही हृदयद्रावक घटना त्यांच्या निवासस्थानी घडली. जेवणाच्या दरम्यान ओम प्रकाश आणि पत्नी पल्लवी यांच्यात वाद झाला. वाद इतका टोकाचा झाला की, त्यानंतर जे घडलं ते अंगावर शहारे आणणारं होतं. पल्लवीने ओम प्रकाश यांच्या डोळ्यांत तिखट टाकून त्यांना अंध करून टाकलं आणि त्यांना दोरखंडाने बांधून ठेवण्यात आलं.

हेही वाचा :जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट; तापमान 41 अंशांवर

यानंतर त्यांच्या मुलीने पित्यावर हल्ला केला. आधी डोक्यावर काचेची बाटली फोडण्यात आली आणि मग पत्नीने 10 ते 12 वेळा धारदार शस्त्राने भोसकलं. हे सगळं घडत असताना ओम प्रकाश यांनी जवळपास 15 ते 20 मिनिटं झुंज दिली, मात्र अति रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी पल्लवी आणि मुलगी कृती या दोघींनाही ताब्यात घेतलं आहे. घरामधून रक्ताचे डाग, काचेचे तुकडे आणि अन्य पुरावे जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीत पल्लवीने हत्या केल्याची कबुली दिली असून, ‘स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि मानसिक छळास कंटाळून हा निर्णय घेतला’ असं ती सांगत आहे.

कुटुंबातील तणावाचा परिणाम?

ओम प्रकाश यांच्या कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू असल्याची माहिती शेजाऱ्यांकडून समोर आली आहे. पल्लवी आणि ओम प्रकाश यांच्यात सतत वाद होत असल्याचं अनेक वेळा पाहिलं गेलं होतं. मात्र हा वाद इतक्या टोकाला जाईल आणि मृत्यूला कारणीभूत ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.

पोलीस तपास सुरू

बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला असून, घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि अन्य डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. पल्लवी आणि कृती यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पोलीस कोठडीसाठी मागणी केली जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number