FIFA World Cup 2026 : फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी! अवघ्या दोन दिवसांत सुरू होणार फिफा विश्वचषकाचा थरार; संघ, स्पर्धा, वेळापत्रक… जाणून घ्या सविस्तर माहिती फक्त एका क्लिकवर

2026 हे वर्ष क्रीडा प्रेमींसाठी ऐतिहासिक वर्ष असणार आहे. फुटबॉल आणि हॉकी वर्ल्ड कपशिवाय या वर्षी कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स यांसारख्या मोठ्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत.

FIFA World Cup 2026 : फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी! अवघ्या दोन दिवसांत सुरू होणार फिफा विश्वचषकाचा थरार; संघ, स्पर्धा, वेळापत्रक… जाणून घ्या सविस्तर माहिती फक्त एका क्लिकवर

2026 हे वर्ष क्रीडा प्रेमींसाठी ऐतिहासिक वर्ष असणार आहे. फुटबॉल आणि हॉकी वर्ल्ड कपशिवाय या वर्षी कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स यांसारख्या मोठ्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या वर्षातील जगभरातील सर्व चाहत्यांसाठी उत्सुकतेची स्पर्धा कुठली असेल तर ती आहे, फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा. 

फिफा विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी. कतार 2022 च्या फिफा विश्वचषक स्पेर्धेत अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा मेस्सी आता पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. 38 वर्षीय मेस्सीसाठी हा विश्वचषक ऐतिहासिक ठरू शकतो, कारण तो आपल्या कारकिर्दीतील सहावा फिफा विश्वचषक खेळण्याच्या उंबरठ्यावर आहे. गतविजेता अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे आणि सोबतच अर्जेंटिना इतिहासातील तिसरा गतविजेता संघ बनून ही ट्रॉफी कायम राखेल का? हे पाहणंदेखील गरजेचं असेल.

फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 11 जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा या स्पर्धेत 48 देशांचे संघ खेळणार असून त्यासाठी पात्रता स्पर्धा सुरू होत्या. पण आता या पात्रता स्पर्धांमधून फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या (FIFA World Cup 2026) मुख्य स्पर्धेत खेळणारे 48 संघ निश्चित झाले आहेत. 12 जून 2026 पासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये फुटबॉलचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलैला खेळवला जाईल.

फिफा वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरलेले 48 संघ –

अर्जेंटिना, पोर्तुगाल, जर्मनी, ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स, कोलंबिया, अमेरिका, नेदरलँड्स, कॅनडा, मेक्सिको, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, क्रोएशिया, इराण, जपान, जॉर्डन, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, उझबेकिस्तान, इराक, इजिप्त, अल्जेरिया, काबो वर्दे, कोते डी'आयव्होर, घाणा, मोरोक्को, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, ट्युनिशिया, डीआर काँगो, कुराकाओ, बोस्निया आणि हर्झेगोविना, हैती, पनामा, इक्वेडोर, पॅराग्वे, झेकिया, उरुग्वे, न्यूझीलंड, नॉर्वे, ऑस्ट्रिया, स्कॉटलंड, स्पेन, स्वित्झर्लंड, स्वीडन, तुर्कस्तान

फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा गटवारीमध्ये खेळली जाणार असून गटवारी पुढीलप्रमाणे

'A' गट – मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, कोरिया, झेकिया

'B' गट – कॅनडा, बोस्निया आणि हर्झेगोविना, कतार, स्वित्झर्लंड

'C' गट – ब्राझील, मोरोक्को, हैती, स्कॉटलंड

'D' गट – अमेरिका, पॅराग्वे, ऑस्ट्रेलिया, तुर्की

'E' गट – जर्मनी, कुराकाओ, आयव्हरी कोस्ट, इक्वेडोर

'F' गट – नेदरलँड्स, जपान, स्वीडन, ट्युनिशिया

'G' गट – बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड

'H' गट – स्पेन, केप वर्दे, सौदी अरेबिया, उरुग्वे

'I' गट – फ्रान्स, सेनेगल, इराक, नॉर्वे

'J' गट – अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रिया, जॉर्डन

'K' गट – पोर्तुगाल, डीआर काँगो, उझबेकिस्तान, कोलंबिया

'L' गट – इंग्लंड, क्रोएशिया, घाणा, पनामा

वेळापत्रक –

11 जून
मेक्सिको वि. दक्षिण आफ्रिका (गट A), मेक्सिको सिटी स्टेडियम

कोरिया प्रजासत्ताक वि. झेकिया (गट A), एस्टाडियो ग्वादालहारा

12 जून
कॅनडा वि. बोस्निया आणि हर्झेगोविना (गट B), टोरोंटो स्टेडियम

अमेरिका वि. पॅराग्वे (गट D), लॉस एंजेलिस स्टेडियम

13 जून
हैती वि. स्कॉटलंड (गट C) बोस्टन स्टेडियम

ऑस्ट्रेलिया वि. तुर्किये (गट D) बीसी प्लेस व्हँकुव्हर

ब्राझील वि. मोरोक्को (गट C) न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम

कतार वि. स्वित्झर्लंड (गट B) सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियम

14 जून
कोते डी'आयव्होर वि. इक्वेडोर (गट E), फिलाडेल्फिया स्टेडियम

जर्मनी वि. कुराकाओ (गट E), ह्यूस्टन स्टेडियम

नेदरलँड्स वि.जपान (गट F) डॅलस स्टेडियम

स्वीडन वि. ट्युनिशिया (गट F) एस्टाडियो मॉन्टेरी

15 जून
सौदी अरेबिया वि. उरुग्वे (गट H), मियामी स्टेडियम

स्पेन वि. काबो वर्दे (गट H), अटलांटा स्टेडियम

इराण वि. न्यूझीलंड (गट जी), लॉस एंजेलिस स्टेडियम

बेल्जियम वि. इजिप्त (गट जी), सिएटल स्टेडियम

16 जून
फ्रान्स वि. सेनेगल (गट I), न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम

बोलिव्हिया/इराक वि. नॉर्वे (गट I), बोस्टन स्टेडियम

अर्जेंटिना वि. अल्जेरिया (गट J), कॅन्सस सिटी स्टेडियम

ऑस्ट्रिया वि. जॉर्डन (गट J), सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियम

17 जून
घाणा वि. पनामा (गट L), टोरोंटो स्टेडियम

इंग्लंड वि. क्रोएशिया (गट L), डॅलस स्टेडियम

पोर्तुगाल वि. काँगो डीआर (गट K), ह्यूस्टन स्टेडियम

उझबेकिस्तान वि. कोलंबिया (गट K), मेक्सिको सिटी स्टेडियम

18 जून
झेकिया वि. दक्षिण आफ्रिका (गट A), अटलांटा स्टेडियम

स्वित्झर्लंड वि. बोस्निया आणि हर्झेगोविना (गट B), लॉस एंजेलिस स्टेडियम

कॅनडा वि. कतार (गट B), बीसी प्लेस व्हँकुव्हर

मेक्सिको वि. कोरिया प्रजासत्ताक (गट A), एस्टाडियो ग्वादालहारा

19 जून
ब्राझील वि. हैती (गट C) फिलाडेल्फिया स्टेडियम

स्कॉटलंड वि. मोरोक्को (गट C) बोस्टन स्टेडियम

तुर्किये वि. पॅराग्वे (गट D), सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियम

अमेरिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गट D), सिएटल स्टेडियम

20 जून
जर्मनी वि. कोट डी'आयव्होर (गट E) टोरोंटो स्टेडियम

इक्वेडोर वि. कुराकाओ (गट E) कॅन्सस सिटी स्टेडियम

नेदरलँड्स वि. स्वीडन (गट F) ह्यूस्टन स्टेडियम

ट्युनिशिया वि. जपान (गट F) एस्टाडियो मॉन्टेरी

21 जून
उरुग्वे वि. काबो वर्दे (गट H), मियामी स्टेडियम

स्पेन वि. सौदी अरेबिया (गट H), अटलांटा स्टेडियम

बेल्जियम वि. इराण (गट G), लॉस एंजेलिस स्टेडियम

न्यूझीलंड वि. इजिप्त (गट G), बीसी प्लेस व्हँकुव्हर

22 जून
नॉर्वे वि. सेनेगल (गट I) न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम

फ्रान्स वि. बोलिव्हिया/इराक (गट I) फिलाडेल्फिया स्टेडियम

अर्जेंटिना वि. ऑस्ट्रिया (गट J) डॅलस स्टेडियम

जॉर्डन वि. अल्जेरिया (गट J) सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियम

23 जून
इंग्लंड वि. घाणा (गट L) बोस्टन स्टेडियम

पनामा वि. क्रोएशिया (गट L) टोरोंटो स्टेडियम

पोर्तुगाल वि. उझबेकिस्तान (गट K) ह्यूस्टन स्टेडियम

कोलंबिया वि. काँगो डीआर (गट K) एस्टाडियो ग्वादालहारा

24 जून
स्कॉटलंड वि. ब्राझील (गट C), मियामी स्टेडियम

मोरोक्को वि. हैती (गट C), अटलांटा स्टेडियम

स्वित्झर्लंड वि. कॅनडा (गट B), बीसी प्लेस व्हँकुव्हर

बोस्निया आणि हर्झेगोविना वि. कतार (गट B), सिएटल स्टेडियम

झेकिया वि. मेक्सिको (गट ए) मेक्सिको सिटी स्टेडियम

दक्षिण आफ्रिका वि. कोरिया प्रजासत्ताक (गट ए), एस्टाडियो मॉन्टेरी

25 जून
कुराकाओ वि. कोटे डी'आयव्होर (गट E), फिलाडेल्फिया स्टेडियम

इक्वेडोर वि. जर्मनी (गट E), न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम

जपान वि. स्वीडन (गट F), डॅलस स्टेडियम

ट्युनिशिया वि. नेदरलँड्स (गट F), कॅन्सस सिटी स्टेडियम

तुर्की वि. अमेरिका (गट D), लॉस एंजेलिस स्टेडियम

पॅराग्वे वि. ऑस्ट्रेलिया (गट D), सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियम

26 जून
नॉर्वे वि. फ्रान्स (गट I), बोस्टन स्टेडियम

सेनेगल वि. बोलिव्हिया/इराक (गट I), टोरोंटो स्टेडियम

इजिप्त वि. इराण (गट G), सिएटल स्टेडियम

न्यूझीलंड वि. बेल्जियम (गट G), बीसी प्लेस व्हँकुव्हर

काबो वर्दे वि. सौदी अरेबिया (गट H), ह्यूस्टन स्टेडियम

उरुग्वे वि. स्पेन (गट H), एस्टाडियो ग्वादालहारा

27 जून
पनामा वि. इंग्लंड (गट L), न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम

क्रोएशिया वि. घाणा (गट L), फिलाडेल्फिया स्टेडियम

अल्जेरिया वि. ऑस्ट्रिया (गट J), कॅन्सस सिटी स्टेडियम

जॉर्डन वि. अर्जेंटिना (गट J), डॅलस स्टेडियम

कोलंबिया वि. पोर्तुगाल (गट K), मियामी स्टेडियम

काँगो डीआर वि. उझबेकिस्तान (गट K), अटलांटा स्टेडियम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number