बायकोच्या फेसबुक फ्रेंडचा प्रताप, 36 तोळे सोन्याचे दागिने केले लंपास

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील एका घरात 6 सप्टेंबरला चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. चोरट्याने 36 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेची चोरी केली होती.अवघ्या 12 तासात  हा गुन्हा उघडकीस आणून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून मुद्देमालही जप्त केला आहे. आरोपी हा फिर्यादीच्या बायकोचा फेसबुक फ्रेंड आहे.निलेश शरद तावरे (वय २९) असे अटक केलेल्या आरोपीचे […]

बायकोच्या फेसबुक फ्रेंडचा प्रताप, 36 तोळे सोन्याचे दागिने केले लंपास

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील एका घरात 6 सप्टेंबरला चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. चोरट्याने 36 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेची चोरी केली होती.अवघ्या 12 तासात  हा गुन्हा उघडकीस आणून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून मुद्देमालही जप्त केला आहे. आरोपी हा फिर्यादीच्या बायकोचा फेसबुक फ्रेंड आहे.निलेश शरद तावरे (वय २९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.बिबवेवाडीतील कोंढवा रस्त्यावर एका सोसायटीत ही चोरी झाली होती.

फिर्यादी एका कंपनीत नोकरी करतात. घटनेच्या दिवशी त्यांची पत्नी मुलांना शाळेतून आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. या तासाभरातच आरोपीने चोरी केली होती..दरम्यान तपास सुरू असताना आरोपीने दरवाजाचे लैच तोडले नसल्याचे दिसले. त्यामुळे यामध्ये बनावट चाविचा वापर झाल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही तपासले असता एकजण संशयास्पदरित्या फिरताना आढळला.

पोलिसांनी सुरक्षारक्षकांना त्याच्या फोटो दाखवला असता तो यापूर्वी दोन वेळेस फिर्यादीच्या घरी येऊन गेल्याचे समजले.आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असताना तो फिर्यादीच्या पत्नीचा फेसबुक फ्रेंड असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी जलदगतीने तपास करीत त्याला सातारा येथून ताब्यात घेतले. आरोपी निलेश तावरे सराईत चोरटा आहे. त्याच्यावर यापूर्वी घरफोडी,वाहनचोरीसह 33 गुन्हे दाखल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number