‘मलिकांचा राजीनामा मागण्याची नैतिकता चंद्रकांत पाटलांकडे आहे का?’ – सुरज चव्हाण

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली. मलिकांवर झालेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली असून ईडी कारवाई विरोधात मविआ नेत्यांनी आंदोलन केले. तर दुसरीकडे विरोधक मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मलिकांनी राजीनामा देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील […]

‘मलिकांचा राजीनामा मागण्याची नैतिकता चंद्रकांत पाटलांकडे आहे का?’ – सुरज चव्हाण

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली. मलिकांवर झालेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली असून ईडी कारवाई विरोधात मविआ नेत्यांनी आंदोलन केले. तर दुसरीकडे विरोधक मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मलिकांनी राजीनामा देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिकांचा राजीनामा मागण्याची नैतिकता चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिकांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मलिकांच्या राजीनाम्यासाठी राज्यात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन करण्यात येत आहेत. मात्र, नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक करण्यात आले. त्यानंतर मलिकांना न्यायलयात हजर करण्यात आले असून न्यायलयात नवाब मलिकांचे वकील आणि ईडीचे वकील यांच्यात चार तासांच्या युक्तीवादानंतर पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number