संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे २८ जूनला पैठणमधून प्रस्थान

आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखी २८ जून रोजी पैठण येथून पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे.

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे २८  जूनला पैठणमधून प्रस्थान

छत्रपती संभाजीनगर : आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखी २८ जून रोजी पैठण येथून पंढरपूरसाठी  प्रस्थान करणार आहे. या पालखीच्या सर्व नियोजनाची तयारी करण्यात येत असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी दिली आहे. नाथ महाराज पालखी २८ जून रोजी प्रस्थान होणार आहे. तर पुढील १९ दिवसांचा पायी प्रवास करून १६ जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. यासाठी मराठवाड्यातील दिंड्यासाठी प्रशासनाने बैठक घेऊन वारकऱ्यांना सुविधा द्यावी अशी मागणी रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number