Manu Bhakar: मनू भाकरवर दु:खाचा डोंगर

पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर हिच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Manu Bhakar: मनू भाकरवर दु:खाचा डोंगर

हरियाणा : पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर हिच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रस्त्याच्या भीषण अपघातात तिच्या मामाचा आणि आजीचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. हरियाणातील चरखी दादरी जवळील महेंद्रगड बायपास रोडवर हा अपघात झाला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजी स्कूटरवरून जात असताना भरभाव वेगाने आलेल्या ब्रेझा कारने त्यांना उडवले. या अपघातामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

दोन दिवसांपूर्वीच मनू भाकर हिचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिने हा पुरस्कार स्वीकारला होता. अशातच तिच्या मामा आणि आजीचा अपघात झाल्याने मनू भाकर आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत ब्रेझा कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून मनू भाकरच्या मामाचा आणि आजीचा मृतहेद शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ब्रेझा कारचालकाचा शोध घेत आहेत.  

हेही वाचा : छगन भुजबळांची नाराजी कायम

मनू भाकरने पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके  जिंकण्याचा विक्रम केला आहे. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र आणि 10 मीटर एअर पिस्तूल महिला गटात मनूने कांस्यपदकाची कमाई केली होती. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली होती.  

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number