पश्चिम बंगालमध्ये मोचा चक्रीवादळाचा इशारा

पश्चिम बंगालमध्ये मोचा चक्रीवादळाच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, मोचा चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर पोहोचले आहे. त्यामुळे म्यानमारमध्येही अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिम बंगाल परिसरात 195 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. तर, हा वेग आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. बांग्लादेशाच्या हवामान खात्याने मोचा चक्रीवादळ हे गेल्या 2 दशकातील देशात धडकणारे सर्वात […]

पश्चिम बंगालमध्ये मोचा चक्रीवादळाचा इशारा

पश्चिम बंगालमध्ये मोचा चक्रीवादळाच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, मोचा चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर पोहोचले आहे. त्यामुळे म्यानमारमध्येही अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

पश्चिम बंगाल परिसरात 195 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. तर, हा वेग आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. बांग्लादेशाच्या हवामान खात्याने मोचा चक्रीवादळ हे गेल्या 2 दशकातील देशात धडकणारे सर्वात शक्तिशाली वादळ असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.

यामुळे देशातील कोरल बेट सेंट मार्टिन बुडण्याचा धोका आहे. सध्या विमानतळ देखील बंद करण्यात आले आहेत. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असे सांगण्यात आले आहे. शनिवारी रात्री मध्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ तीव्र बनले. याचा परिणाम जगातील सर्वात मोठ्या निर्वासित छावणीवरही होऊ शकतो. या पार्श्वभूमिवर, स्थानिक लोकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आठ पथके आणि 800 बचाव कर्मचारी, 200 बचाव कर्मचारी तैनात केले आहेत. तर 100 जवानांना राखीव ठेवण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number