मुलीसाठी टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ बनला ‘गली बॉय’!

महेंद्रसिंग धोणी आणि त्यांची मुलगी झिवा यांच्या viral video नंतर आता टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा आपल्या मुलीसोबतचा व्हिडिओ चांगलाच viral होतोय. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आपली छोटीशी लेक समायरा हिच्यासाठी ‘गली बॉय’ सिनेमातील रॅप सॉंग गाताना दिसतोय. मुलीसाठी रोहितचं रॅप! रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ सिनेमाने बाकी प्रेक्षकांप्रमाणेच रोहित शर्मालादेखील रॅप साँगचं वेड लावलंय. ‘गली […]

मुलीसाठी टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ बनला ‘गली बॉय’!

महेंद्रसिंग धोणी आणि त्यांची मुलगी झिवा यांच्या viral video नंतर आता टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा आपल्या मुलीसोबतचा व्हिडिओ चांगलाच viral होतोय. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आपली छोटीशी लेक समायरा हिच्यासाठी ‘गली बॉय’ सिनेमातील रॅप सॉंग गाताना दिसतोय.

मुलीसाठी रोहितचं रॅप!

रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ सिनेमाने बाकी प्रेक्षकांप्रमाणेच रोहित शर्मालादेखील रॅप साँगचं वेड लावलंय.

‘गली बॉय’ सिनेमात रणवीर सिंगने म्हटलेलं रॅप सॉंग ‘असली हिप हॅप’ प्रेक्षकांना खूप आवडलंय आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मादेखील या रॅप साँगचा फॅन झाला आहे.

रोहित शर्माने आपल्या 3 महिन्यांच्या छोट्या लेकीसाठी हेच रॅप साँग गायलंय.

या बाप-लेकीच्या गोड नात्याचा व्हिडिओ रोहितने Twitter वर पोस्ट केलाय.


 

या व्हिडिओमध्ये रोहित छोट्या समायरासाठी रॅप साँग गाताना दिसतोय.

या व्हिडिओवर रोहितच्या चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय.

अनेकजणांनी हा व्हिडिओ Retweet केलाय.

या व्हिडीओमध्ये रोहितचं त्याच्या मुलीवरचं प्रेम आणि जिव्हाळा सहज दिसून येतो.

हा व्हिडिओ पाहून बॉलिवूडचे महानायक ‘बीग बी’ अमिताभ बच्चन हे देखील कमेंट केल्यावाचून राहू शकले नाहीत.

आणि त्यांनी त्या व्हिडीओवर ‘खूपच क्युट’ अशी कमेंट केली.

तर ‘गली बॉय’ सिनेमात ‘MC शेर’ या रॅपरच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या सिद्धांत चतुर्वेदी या अभिनेत्यानेही त्या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number