उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महिलांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध

उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदास तयारी सुरू झाली आहे. दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी महिलांसाठी विशेष घोषणा केली आहे. प्रियंका गाधी यांनी महिलांसाठी खास जाहिरनामा सादर केला आहे. महिलांना  अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महिला सशक्तीकरणाचा मुद्दा पुढे ठेवत उत्तरप्रदेश निवडणुकींमध्ये ४० टक्के तिकीट महिलांना […]

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महिलांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध

उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदास तयारी सुरू झाली आहे. दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी महिलांसाठी विशेष घोषणा केली आहे. प्रियंका गाधी यांनी महिलांसाठी खास जाहिरनामा सादर केला आहे. महिलांना  अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महिला सशक्तीकरणाचा मुद्दा पुढे ठेवत उत्तरप्रदेश निवडणुकींमध्ये ४० टक्के तिकीट महिलांना देण्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी केली आहे. तसेच महिलांना तीन महिने घरगुती सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी केली आहे. महिलांना नोकरीमध्ये तसेच व्यवसायामध्ये सवलती काँग्रेसकडून देण्यात आल्या आहेत. पोलिस भरतीमध्ये महिलांना २५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थींना मोफत स्कूटी आणि स्मार्ट फोन देण्यात येणार आहेत.

काँग्रेसकडून महिलांसाठी जाहीरनामा

  • उत्तरप्रदेश निवडणुकींमध्ये महिलांना ४० टक्के तिकीटे
  • सरकारी नोकरीत महिलांना ४० टक्के आरक्षण
  • सरकारी बसेसेवेत महिलांना मोफत प्रवास
  • महिलांना ३ महिने मोफत सिलेंडर
  • महिलांना नोकरीमध्ये तसेच व्यवसायामध्ये विशेष सवलती
  • पोलिस भरतीमध्ये महिलांना २५ टक्के आरक्षण
  • विद्यार्थींना मोफत स्कूटी आणि स्मार्ट फोन
  • आशा वर्कर्सना १० हजार रुपयांपर्यंत मानधन
  • महिलांसाठी संध्याकाळच्या शाळा भरवण्यात येतील
  • महिला सुरक्षेसाठी आयोगाची स्थापना करण्यात येईल
  • महिलांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number