मिठाच्या गोण्यात निघाले कोकेन

महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातच्या बंदरावरून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. हे सर्व ड्रग्ज इराणमधून गुजरातमध्ये आयात करण्यात आले. विशेष म्हणजे मीठ असल्याचं सांगून या ड्रग्जची आयात करण्यात आली आहे.२५ मेट्रिक टनाच्या १००० मिठाच्या बॅग्ज आहेत असा दावा करण्यात आला होता. मात्र, डीआरआयने २४ ते २६ मे या काळात केलेल्या तपासणीत मालवाहू […]

मिठाच्या गोण्यात निघाले कोकेन

महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातच्या बंदरावरून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. हे सर्व ड्रग्ज इराणमधून गुजरातमध्ये आयात करण्यात आले. विशेष म्हणजे मीठ असल्याचं सांगून या ड्रग्जची आयात करण्यात आली आहे.२५ मेट्रिक टनाच्या १००० मिठाच्या बॅग्ज आहेत असा दावा करण्यात आला होता. मात्र, डीआरआयने २४ ते २६ मे या काळात केलेल्या तपासणीत मालवाहू जहाजात ५२ किलो कोकेन सापडलं.

काही पिशव्या संशयास्पद आढळल्या. या पिशव्यांमध्ये पावडरच्या स्वरूपात एक दुर्गंधीयुक्त पदार्थ आढळून आला. त्या संशयास्पद पिशव्यांमधून नमुने घेण्यात आले आणि गुजरात सरकारच्या फॉरेन्सिक सायन्स संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी तपासले, त्यांनी या नमुन्यांमध्ये कोकेनचे नमुने असल्याचे नोंदवले. डीआरआयने आतापर्यंत ५२ किलो कोकेन जप्त केले आहे. एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदीनुसार जप्तीची कारवाई सुरू आहे. या आयात मालासोबत समावेश असलेल्या व्यक्तींची डीआरआयकडून चौकशी केली जात आहे.

वर्ष २०२१-२२ मध्ये डीआरआयने देशभरातून ३२१ किलो कोकेन जप्त केले होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारपेठेत ३२०० कोटी किंमत आहे. गेल्या एका महिन्यात, डीआरआयने कांडला बंदरात आयात केलेल्या जिप्सम पावडरच्या लॉटमधून २०५ किलो हेरॉईन, पिपावाव बंदरात ३९५ किलो हेरॉइन, दिल्ली विमानतळ एअर कार्गो कॉम्प्लेक्स, लक्षद्वीप बेटांवर ६२ किलो हेरॉईनसह अनेक प्रकरणांची नोंद आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number