नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुद्धिबळाच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंद आणि नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांच्यात चुरस आहे. अंतिम सामन्यातील पहिला आणि दुसरा डाव अनिर्णित राहिला. आता तिसरा डाव गुरुवारी होणार आहे. यामुळे विश्वविजेता कोण होणार या प्रश्नाचे उत्तर गुरुवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यात बाजी मारली तर भारताचा रमेशबाबू प्रज्ञानानंद बुद्धिबळाचा विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू होणार आहे.
Magnus Carlsen takes a quiet draw with white against Praggnanandhaa and sends the final to tiebreaks. The winner of the #FIDEWorldCup will be decided tomorrow! 📷 Maria Emelianova pic.twitter.com/aJw1vvoFnK — International Chess Federation (@FIDE_chess) August 23, 2023