IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्जची बंगळुरु चॅलेंजर्सवर सुपर मात

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धांची नुकतीच सुरूवात झाली. पहिला  सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघात झाला.चेन्नई सुपर किंग्जने  रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर सात विकेटनी मात केली. नाणेफेक चेन्नईने जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इम्रान ताहीर, हरभजन सिंह, रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंमुळे बंगळुरुचा संघ अवघ्या 70 धावांपर्यंत पोहचू शकला.चेन्नईने बेंगळुरूला १७.१ षटकांत […]

IPL 2019 :  चेन्नई सुपर किंग्जची बंगळुरु चॅलेंजर्सवर सुपर मात

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धांची नुकतीच सुरूवात झाली. पहिला  सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघात झाला.चेन्नई सुपर किंग्जने  रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर सात विकेटनी मात केली. नाणेफेक चेन्नईने जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इम्रान ताहीर, हरभजन सिंह, रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंमुळे बंगळुरुचा संघ अवघ्या 70 धावांपर्यंत पोहचू शकला.चेन्नईने बेंगळुरूला १७.१ षटकांत ७० धावांत गुंडाळले. यानंतर विजयी लक्ष्य तीन विकेटच्या मोबदल्यात १७.४ षटकांत पूर्ण केले. बंगळुरुमध्ये पार्थिव पटेल  सोडून एकही फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना करु न शकल्याने  75 धावांत बाद होणारा हा पहिला संघ ठरला आहे. चेपॉकच्या एम. चिदंबरम स्टेडियममध्ये ही लढत झाली.

असा झाला सामना

नाणेफेक चेन्नईने जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

बंगळुरुतून विराट कोहली अवघ्या ६ धावांवर बाद झाला.

कोहलीच्या नंतर एक-एक करुन सगळेच बाद होत गेले.

हरभजन सिंह आणि इमरान ताहीर यांनी प्रत्येकी ३ तर रविंद्र जडेजाने २ बळी घेतले.

अवघ्या ७० धावांवर बंगळुरुने गाशा गुंडाळला.

शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांना माघारी पाठवण्यात बंगळुरूच्या गोलंदाजांना यश आलं.

अंबाती रायडू, केदार जाधव आणि रविंद्र जडेजा यांनी शांतपणे फलंदाजी करत विजय खिशात गुंडाळला.

दरम्यान सुरेश रैना आणि विराट  कोहली यांच्यात सर्वात प्रथम 5000 धावा करण्याची शर्यत रंगली होती.आजच्या सामन्यात या दोघांपैकी कोण प्रथम 5000 धावा करणार यासाठी दोघेही उत्सुक होते. या शर्यतीत बाजी मारण्यासाठी रैनाला 15 धावांची गरज होती, तर कोहलीला 52 धावांची गरज होती. या सामन्यात १९ चेंडूंत १५ धावा करत रैनाने ही शर्यत जिंकली. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणार रैना हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number